सामाजिक उपक्रम
…या शहरात ‘पाणपोई’चे उदघाटन संपन्न
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील व्यापारी दृष्ट्या महत्वाच्या गणल्या गेलेल्या अटल मार्ग(गोदाम गल्ली)येथे महाशिवरात्र व जागतिक महिला दिनाच्या मुहूर्तावर पाणपोई उदघाटन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.
फार पूर्वीपासुन,कडक उन्हाळ्यात,येणाऱ्या-जाण्याऱ्या पांथस्थांना ‘पिण्याचे पाणी’ मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ (निःशुल्क) व्यवस्था म्हणजे पाणपोई समजली जाते.या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात,देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेविल्या जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.
फार पूर्वीपासुन,कडक उन्हाळ्यात,येणाऱ्या-जाण्याऱ्या पांथस्थांना ‘पिण्याचे पाणी’ मिळावे म्हणुन करण्यात आलेली धर्मार्थ (निःशुल्क) व्यवस्था म्हणजे पाणपोई समजली जाते.या प्रकारची व्यवस्था पूर्वीच्या काळात,देवळात,धर्मशाळेत करण्यात येत असे.तेथे मातीचे रांजण वा मोठे माठ आदल्या दिवशी रात्रीपासुन विहिरीच्या पाण्याने भरून ठेविल्या जात असे.दुसऱ्या दिवशी सकाळपासून त्यातुन थंड पाणी मिळे.कोणास चांगले पिण्याचे पाणी पाजणे हे हिंदू धर्मानुसार पुण्याचे काम समजले जाते आजही त्याची अनेक सामाजिक संस्था अंमलबजावणी करताना दिसत आहे.त्यातून तुषार्त नागरिक आपली पाण्याची तहान भागवत असतात.त्यातून पक्षी आणि छोटे प्राणी यांनाही दिलासा मिळत असतो.अशीच पाणपोई नुकतीच अटल मार्ग गोदाम गल्ली येथे ‘महाशिवरात्र’ व ‘जागतिक महिला दिना’चे औचित्य साधत गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने स्वर्गीय शकुंतला नेमीचदजी गोधा यांच्या स्मरणार्थ गोदाम गल्ली येथे पाणपोई सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान सदर प्रसंगी महिला दिनानिमित्त गोदाम गल्ली परिसरातील कर्तुत्ववान महिलांचा गोदाम गल्ली व्यापारी असोसिएशनच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कोपरगाव नगरपरिषेच्या माजी नगराध्यक्ष सुहासिनी कोयटे,किरण डागा, शोभना ठोळे,रंजना बंब,श्रीमती शोभा ठोळे,पूजा गोधा,पत्रकार अनिल दिक्षित,मोबीन रंगरेज आदि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमास गोदाम गल्ली परिसरातील सर्व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.याप्रसंगी सुहासिनीताई कोयटे,ॲड.श्रद्धा जवाद,किरण डागा,कोपरगाव शहर व्यापारी महासंघाचे सचिव सुधीर डागा या मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.