जाहिरात-9423439946
धार्मिक

दहिवड ते पंढरपूर दिंडीचे कोपरगावात जोरदार स्वागत

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

नाशिक जिल्ह्यातील व देवळा तालुक्यातील दहिवड येथुन ह.भ.प.वै.रामदास बाबा यांच्या प्रेरणेने निघणारी पंढरपूर दिंडी यंदा ह.भ.प.समाधान महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत असून आज तिचे कोपरगाव येथे आज सकाळी ०९ वाजेच्या सुमारास आगमन झाले होते त्या दंडीचे पंढरीच्या वाटेवर कोपरगाव येथील प्रसिद्ध डॉ.राजेश माळी व त्यांच्या परिवाराने विष्णू चित्रपट गृहाजवळ अल्पोपहार,चहापाण्याचे नियोजन करून जोरदार स्वागत केले आहे.

संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे.एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.जो नियमित वारी करतो तो वारकरी.वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.राजभरातून या दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करत असतात.दहिवाड येथील दिंडी नुकतीच रवाना झाली असून तिचे डॉ.राजेश माळी आणि परिवाराने जोरदार स्वागत केले आहे.

‘पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात देवळा तालुक्यातील श्री क्षेत्र दहिवड येथूनही दर वर्षी हि दिंडी ह.भ.प.समाधान महाराज यांचे मार्गदर्शनाखाली जात असून हे दिंडीचे पहिलेच अकरावे आहे.यावर्षीची दिंडी आज सकाळी कोपरगाव येथील डॉ.माळी यांचे निवासस्थांनी पोहचली होती.त्यांचे टाळ मृदंगाच्या गजरात,अभंग भजन गात वातावरण भक्तिमय वातावरणात स्वागत केले आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सदर प्रसंगी दिंडीच्या स्वागतासाठी प्रसिद्ध डॉ.राजेश माळी,सुवर्णा माळी, डॉ.भास्कर,रवि देवकर,श्री गायकवाड, राधिका वडांगळे,ज्योती परदेशी,वृत्तपत्र छायाचित्रकार हेमचंद्र भवर,सलोनी भागवत,डॉ.क्षत्रिय,सौ.शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close