धार्मिक
पंढरपूर साठी…या ठिकाणाहून निघणार पायी दिंडी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री क्षेत्र भऊर ते श्री क्षेत्र पंढरपूर या साठी रोकडेश्वर महाराज मंदिरापासून गुरुवार दि.१५ जून रोजी सकाळी १० वाजता पायी दिंडी रवाना होणार असून दिंडीचे हे पहिलेच वर्ष असल्याची माहिती ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली आहे.
वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.वारी ही महाराष्ट्रातील एक मोठी धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होते.आळंदी येथून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूर येथे मार्गस्थ होते.वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर या ठिकाणाहून यावर्षी ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली दि.१५ जून रोजी सकाळी १० वाजता तीचे प्रस्थान होत आहे.
ह.भ.प.संजय महाराज जगताप श्री क्षेत्र भऊर ता.वैजापूर जि.अ.नगर.
संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे.एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.जो नियमित वारी करतो तो वारकरी.वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.’पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथूनही दर वर्षी हि दिंडी ह.भ.प.संजय महाराज जगताप यांचे मार्गदर्शनाखाली जात असून हे दिंडीचे पहिलेच वर्ष आहे.यावर्षी हि दिंडी गुरुवार दि.१५ जून रोजी सकाळी १० वाजता रोकडेश्वर मंदिरातून प्रस्थान होणार आहे.
सदर दिंडीचा पहिला मुक्काम गोंडेगाव येथे राहणार असून दुसरा मुक्काम देवळाली येथे तर तिसरा मुक्काम धमोरी नांदगाव गुरुनानक हॉटेल शेजारी राहणार आहे.चौथा मुक्काम हा वडगाव गुप्ता येथे,तर पंचम मुक्काम दहिगाव माउल येथे राहणार आहे.तर सहावा मुक्काम कोकणगाव येथे सातवा मुक्काम डाकू निमगाव,आठवा मुक्काम एस.डी.कॉलनी करमाळा या ठिकाणी तर नववा मुक्काम हा मौजे पांगरे या ठिकाणी राहणार आहे.दहावा मुक्काम हा मौजे-दगडी अकोले येथे राहणार आहे.अकरावा मुक्काम हा खंडी सेंटरच्या जवळ विटभट्टी जवळ करकम या ठिकाणी राहणार आहे.बारावा मुक्काम हा पंढरपूर या ठिकाणी राहणार आहे.
अखेर विसाव्याचे ठिकाण हे पंढरपूर येथे साधुसंत प्रभुजी महाराज (संतोष महाराज) शेगाव रोड,हरेकृष्ण धाम इस्कॉन मंदिराच्या समोर श्री विठ्ठल मठ येथे राहणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.दि.२९ जून रोजी सायंकाळी ०६ वाजता संजय महाराज जगताप यांचा कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.तर ३० जून रोजी सकाळी ०९ वाजता त्यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.या दिंडीत समाविष्ट होणाऱ्या वारकऱ्यांनी आपली नावे मो.क्रं.९८५०२४ १२८८,९३०७० ७१५२१,८०१००८९१३८ आदींवर नोंदवावी असे आवाहन शेवटी संजय महाराज यांनी केले आहे.