धार्मिक
…या साईभक्तांसाठी उन्हाळ्यात पाण्याची व्यवस्था करणार-माहिती

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने मुंबई व परिसरातुन पालखी सोबत येणा-या पदयात्रींची पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी मुंबई ते शिर्डी महामार्गावर ठिकठिकाणी पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली असून याकामी कोपरगांव येथील वाल्मीकराव कातकडे बंधु यांनी विनामुल्य १० पाण्याचे टॅकर चालकासह दिलेले असल्याची माहिती संस्थानच्या वतीने दिली आहे.
मुंबई,ठाणे आदी ठिकाणाहून येणाऱ्या दिंड्या या सिन्नर पासून पूर्वेकडे येत असताना ती दुष्काळी भागातून येत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले असते.त्यावेळी साई भक्तांचे हाल होऊ नये साठी साईबाबा संस्थान दक्षता घेत असते ती त्यांनी यावेळी घेतली आहे.त्यासाठी त्यांना कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक वाल्मीकराव कातकडे यांच्या रूपाने दाता मिळाला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिर्डी येथील श्री साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी रामनवमीच्या पावन मुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर साई भक्त मुंबई,ठाणे,कल्याण,गुजरात आदी ठिकाणाहून येत असतात.उन्हाळा असल्याने उन्हाची तीव्रता वाढत जाते तशी पाण्याची गरज वाढत जाते.सदर दिंडी हि सिन्नर पासून पूर्वेकडे येत असताना ती दुष्काळी भागातून येत असल्याने पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेले असते.त्यावेळी साई भक्तांचे हाल होऊ नये साठी साईबाबा संस्थान दक्षता घेत असते ती त्यांनी यावेळी घेतली आहे.त्यासाठी त्यांना कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक वाल्मीकराव कातकडे यांच्या रूपाने दाता मिळाला असून त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याकरीता संस्थानच्या वतीने इंधन खर्च व २५ कर्मचारी व्यवस्था करण्यात आली आहे.आज या टॅकरची संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांच्या हस्ते विधीवत पुजन करुन मुंबई-शिर्डी महामार्गावर टॅकर रवाना करण्यात आले.यावेळी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी सर्वश्री दिलीप उगले,संजय जोरी,उपकार्यकारी अभियंता बी.डी.दाभाडे, देणगीदार साईभक्त वाल्मीकराव कातकडे,पाणी पुरवठा विभागाचे प्र.विभाग प्रमुख किसन गाडेकर व कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.