धार्मिक
शिर्डीत…हे शंकराचार्य साईचरणी लिन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री क्षेत्र शिर्डीत जगतगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थजी महाराज हे शिर्डीत साई दर्शनाला आले होते त्यांनी साई मंदिरात जात श्री साईबाबांचे दर्शन घेत पाद्यपुजा केली असल्याची माहिती बाळासाहेब सेना गटाचे जिल्हाध्यक्ष कमलाकर कोते यांनी दिली आहे.
श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामींनी बारा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दर्शन भ्रमण करत असताना महाराष्ट्र दर्शन दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथून शिर्डीत येत शंकराचार्यांनी साई दर्शन घेतले शिर्डीत सिद्ध पुरुष श्री साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला आनंद झाल्याचे सांगितले आहे.
यावेळी त्यांच्या समवेत आसामचे मंत्री बोलिन चोटिया,शिर्डीतील शिवसेना जिल्हाप्रमुख कमलाकर कोते,राजेंद्र देवकर, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ,शिवाजी दिशागत,साई निर्माणचे विजय कोते,चंद्रकांत गायकवाड यांसह बहुसंख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
श्री क्षेत्र जगन्नाथ पुरी पिठाचे शंकराचार्य स्वामींनी बारा ज्योतिर्लिंग आणि शक्तीपीठ दर्शन भ्रमण करत असताना महाराष्ट्र दर्शन दरम्यान त्र्यंबकेश्वर नाशिक येथून शिर्डीत येत शंकराचार्यांनी साई दर्शन घेतले शिर्डीत सिद्ध पुरुष श्री साईबाबांचे दर्शन घेऊन मनाला आनंद झाल्याचे सांगितले असून शिर्डीत अध्यात्मिक ऊर्जेची अनुभूती झाल्याचे सांगत बाबांकडे राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केली असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
कमलाकर कोते आणि विजय कोते यांनी यावेळी त्यांचा सन्मान केला आहे त्यावेळी त्यांनी श्री साईबाबांची शाल आणि उदी त्यांना भेट स्वरूपात दिली आहे.जिल्हाप्रमुख कमलाकर कोते यांनी शिर्डीत सर्व दर्शन तसेच निवासाची व्यवस्था केली होती त्यांनी त्यावेळी संस्थानच्या कर्मचाऱ्यांची वागणूक व सेवा विनम्र असल्याचे नमूद केले आहे.