धार्मिक
मुख्यमंत्री शिंदे यांनी सपत्नीक घेतले श्री साईबाबा समाधी दर्शन
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक आज शिर्डी येथे श्री.साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासोबत महसूल, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे,शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर उपस्थित होते.
यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर पाटील,जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर,शिर्डी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल जाधव,प्रांताधिकारी गोविंद शिंदे उपस्थित होते.
तत्पूर्वी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे साईबाबा संस्थानच्या हेलिपॅडवर आज आगमन झाले.यावेळी महसूल,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.यावेळी शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर त्यांच्या समवेत उपस्थित होते.