धार्मिक
…या इतिहास प्रसिद्ध सप्ताहाची तयारी जोरात सुरु !
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे होणाऱ्या योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या १७५ व्या अखंड हरीनाम सप्ताहासाठी सप्ताह समितीने तयारी सुरु केली असून त्यासाठी विविध संस्था आणि भक्तांना भेटीगाठीचा कार्यक्रम सुरु केला असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहोम यांनी दिली आहे.
कोकमठाण हद्दीत श्री संत जंगलिदास महाराज आश्रमा शेजारी सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.त्या सप्ताहाचे निमंत्रण नुकतेच सप्ताह कमिटीच्या वतीने आ.आशुतोष काळे यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या कार्यालयात जावून देण्यात आले आहे.
मंगळवार दिनांक २ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट २०२२ या कालावधीत नगर-मनमाड राज्य मार्गावर कोकमठाण हद्दीत श्री संत जंगलिदास महाराज आश्रमा शेजारी सरला बेटाचे मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होत आहे.त्या सप्ताहाचे निमंत्रण नुकतेच सप्ताह कमिटीच्या वतीने आ.आशुतोष काळे यांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर त्यांच्या कार्यालयात जावून देण्यात आले आहे.त्यावेळी त्यांनी सप्ताहाच्या तयारीची माहिती उपस्थित सप्ताह कमिटीच्या सदस्यांकडून जाणून घेतली.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की,”कर्मवीर शंकरराव काळे कारखाना कार्यस्थळावर देखील दरवर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन केले जात असून आजतागायत ती परंपरा सुरू आहे.काळे परिवाराचा धार्मिक वारसा जोपासतांना योगीराज सदगुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह हा कोपरगाव तालुक्यात होत आहे याचा विशेष आनंद वाटतो.हा सप्ताह कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी तसेच शेजारील तालुक्यातील नागरिकांसाठी मोठी धार्मिक पर्वणी आहे.त्या निमित्ताने या सोहळ्याला लागणारी मदत आपणाकडून देईल असे आश्वासन त्यांनी शेवटी सप्ताह समितीच्या सदस्यांना दिली आहे.
सदर प्रसंगी सप्ताह समितीचे अध्यक्ष सुधाकर रोहम,उपाध्यक्ष संभाजीराव रक्ताटे,सचिव शरद नाना थोरात,तसेच महेश लोंढे,विजयराव रक्ताटे,विजयराव थोरात,वसंतराव लोंढे,सुभाषराव जाधव,जालिंदर हाडोळे,नंदू पवार,दीपक रोहम,सुखदेव वाघ,गोकुळ शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.