जाहिरात-9423439946
निवडणूक

ग्रामपंचायत निवडणुका उद्धवसेना लढणार,आज पहिला दिवस निरंक !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यात होऊ घातलेल्या २६ ग्रामपंचायतीच्या सुरू होत असलेल्या निवडणुका उद्धव शिवसेना पक्षाच्या वतीने लढवणार असून स्थानिक उपतालुकाप्रमुख गट गण प्रमुखांनी तातडीने बैठका घेऊन सरपंच व सदस्यांचे फॉर्म भरण्याचे नियोजन करावे असे आवाहन उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे व तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे यांनी बैठकीत केले आहे.दरम्यान आज नामनिर्देशन भरण्याचा पहिलाच दिवस असताना सदर अर्ज भरण्याची वेबसाईट सुरु होऊ न शकल्याने इच्छुकांचा हिरमोड झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान आज सदर ग्रामपंचायतीसाठी नामनिर्देशन पत्र भरण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी तहसील कार्यालयात आज मात्र दुपारी ३ वाजेपर्यंत वेबसाईट सुरु होऊ शकली नाही त्यामुळे पहिला दिवस निरंक गेला असल्याची धक्कादायक माहिती हाती आली असून इच्छुकांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.त्यास तहसीलदार विजय बोरुडे यांनी दुजोरा दिला आहे.

राज्यातील विविध जिल्ह्यांतील ७ हजार ७५१ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे.त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली असून २० डिसेंबर रोजी मतमोजणी होईल अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यांनी नुकतीच केली आहे.त्यामुळे ऐन हिवाळ्यात कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीसह ग्रामीण महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

“ऑक्टोबर २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित या सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी १८नोव्हेंबर रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.नामनिर्देशनपत्र २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत दाखल करण्यात येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी ५ डिसेंबर रोजी होईल.नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.मतदान १८ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत होईल.नक्षलग्रस्त भागात दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.मतमोजणी २० डिसेंबर २०२२ रोजी संपन्न होणार असल्याने आता कोपरगाव तालुक्यातील राजकीय पक्षांनी आपले घोडे त्यांचे खोगीर बाहेर काढले असून नाल,मेख,तंग तोबरा,बारुद तयारी सुरु केली असून आपल्या सरदार,दरकदार,बारगिरांना ताकीद फर्मावली आहे.त्यासाठी उद्धव ठाकरे सेनेने खर्डे कॉम्प्लेक्स येथे ऑनलाइन फॉर्म भरणे व इतर अडचणी सोडवण्याकरिता स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे.
ग्रामपंचायत पातळीवर मोठ्या प्रमाणात गट तटामुळे विकास कामांना अडथळे येत असून ग्रामपंचायतचा कारभार पारदर्शक होण्यासाठी सदस्य व सरपंच म्हणून चांगल्या उमेदवाराची आवश्यकता आहे.अजूनही पाणी,रस्ते,वीज,सामान्य कुटुंबाच्या अडचणी केंद्र व राज्य शासनाच्या योजना थेट ग्रामपंचायतच्या माध्यमातून तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायतीला सक्षम व अभ्यासू सदस्य व सरपंचाची आवश्यकता आहे.त्यामुळे गाव पातळीवर चांगले उमेदवार शिवसेनेच्या माध्यमातून निवडणुकीत उभे करून निवडणुकीला सामोरे जाण्याची भूमिका सर्वांनी मांडली.
सदर बैठकीत भाऊसाहेब शेळके,कृष्णा अहिरे, अशोक कानडे,राहुल होन,विजय गोरडे, लक्ष्मण पुरी,बाळासाहेब मापारी,भाऊसाहेब मंचरे,रमेश वाकचौरे,अतुल संवत्सरकर, अशोक मुरडणर,राजेंद्र नाजगड,मच्छिंद्र नवले, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close