धार्मिक
नर्मदा परिक्रमा स्वागत दिंडी’चा सोहळा होणार !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक ध्यानपीठ येथील नर्मदा परिक्रमा पूर्ण करून परतणाऱ्या संतांच्या स्वागतासाठी कोपरगाव शहरवासी व पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने कोपरगाव शहरात 18 मार्च रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य ‘नर्मदा प्रदक्षिणा स्वागत दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे.जवळपास 3 हजार 600 किलोमीटरचा पायी प्रवास पूर्ण करून ही परिक्रमा यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली आहे.आत्मा मालिक ध्यानपीठ हे ‘प्रत्येक मानवाच्या हृदयात परमेश्वर निवास करतो’ या वैश्विक तत्त्वावर कार्यरत असून ध्यान या आत्मिक साधनेच्या माध्यमातून समाजामध्ये आत्मचिंतनाचा संदेश पोहोचवत आहे.आत्मा मालिक माऊली यांच्या मार्गदर्शनाखाली विविध संतासमवेत हा आध्यात्मिक प्रसार सुरू आहे.

नर्मदा परिक्रमा ही मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील पवित्र नर्मदा नदीच्या काठावरून केली जाणारी एक प्राचीन पायी तीर्थयात्रा आहे.ही यात्रा अमरकंटक (उगम) ते भरूच (समुद्र संगम) आणि परत अशी अंदाजे २६०० ते ३५०० किमीची असते,ज्यासाठी ३ वर्षे,३ महिने आणि १३ दिवस लागतात.हे शिवकन्या मानल्या जाणाऱ्या नदीचे आध्यात्मिक आणि शारीरिक आत्मशुद्धीचे व्रत मानले जाते.
नर्मदा परिक्रमा ही मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील पवित्र नर्मदा नदीच्या काठावरून केली जाणारी एक प्राचीन पायी तीर्थयात्रा आहे.ही यात्रा अमरकंटक (उगम) ते भरूच (समुद्र संगम) आणि परत अशी अंदाजे २६०० ते ३५०० किमीची असते,ज्यासाठी ३ वर्षे,३ महिने आणि १३ दिवस लागतात.हे शिवकन्या मानल्या जाणाऱ्या नदीचे आध्यात्मिक आणि शारीरिक आत्मशुद्धीचे व्रत आहे.त्यासाठी अलीकडील काळात कालावधी कमी झाला आहे.याचे धार्मिक आणि आध्यात्मिक मोठे महत्व मानले जाते.
नर्मदा दिंडी सोहळ्याची सुरुवात कोपरगावातील साईबाबा कॉर्नर येथून होणार असून,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,स्वामी समर्थ मंदिर मार्गे आश्रमापर्यंत हा सोहळा पार पडणार आहे.दिंडीमध्ये आत्मस्वरूपाचा रथ अग्रभागी असून मंगल वाद्यांच्या गजरात व वाहन दिंडीच्या स्वरूपात हा सोहळा साजरा होणार आहे.राज्यभरातील मोठ्या संख्येने भाविक या दिंडीमध्ये सहभागी होणार असून,आश्रमात आगमनानंतर कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तसेच 19 मार्च रोजी गुढीपाडव्याच्या निमित्ताने पहाटे माता नर्मदा जलपूजन,कन्या पूजन,नवनाथ पूजन व गुढी पूजनाचे कार्यक्रम संपन्न होणार आहेत.

दरम्यान या दोन्ही दिवसांत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.तरी कोपरगाव शहरातील व पंचक्रोशीतील सर्व नागरिक व भाविकांनी या दिंडी सोहळ्यात व गुढीपाडवा विशेष कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन परमपूजनीय आत्मा मालिक माऊली यांचे दर्शनासह संत सानिध्यात सत्संगाचा लाभ घ्यावा,असे आवाहन परमानंद महाराज यांनी केले आहे.या प्रसंगी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाचे विद्यार्थीही या आयोजनात सहभागी होऊन सोहळ्याची सेवा करत शोभा वाढविणार असल्याचे तसेच सर्व भाविकांसाठी महाप्रसाद व्यवस्था करण्यात आली आहे असे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार सूर्यवंशी यानी शेवटी सांगितले आहे.



