जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगाव येथील भाविकांना आता मोठी मेजवानी..!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

   कोपरगाव शहरात यापूर्वी अनेक धार्मिक कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करणाऱ्या श्री साईगाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने यावर्षी भाविकांना धुंडिसुत मालू कवी विरचित “श्री नवनाथ भक्तिसार ” या कथेची मेजवानी हरिद्वार येथील प्रसिद्ध आचार्य शिरीषजी महाराज यांच्या मुखर्विंदातून केली असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.त्यामुळे भाविकांना यावर्षी वेगळी आध्यात्मिक मेजवानी मिळणार असल्याचे मानले जात आहे.त्यासाठी मोठी गर्दी होणार आहे.

श्री नवनाथ.

या पूर्वी साई गाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने या पूर्वी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा,बाबा महाराज यांचे संत चरित्र,केशव  महाराज उखळीकर यांची भागवत कथा,गणेशानंद महाराज यांचे देवी भागवत कथा,संत द्यानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज चरित्र,विवेक बुवा गोखले यांचे दत्त महात्म्य,शिव पुराण कथासार,केशव महाराज उखळीकर यांची श्री कृष्ण लीला,अनुराधा दीदी यांची बाबाजी भगवान कथा,चारुदत्त आफळे यांचे विष्णू महापुराण कथा आदी लोकप्रिय उपक्रम मोठमोठे विक्रम मोडत हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्याचे अनुकरण आता बरीच राजकीय मंडळी करू लागली आहे.


  अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव हा दक्षिणगंगा गोदावरीच्या काठावर वसलेला,१३ व्या शतकातील कोकमठाणचे हेमाडपंती शिवमंदिर,पेशवेकालीन वाडे,साईबाबांची तपोभूमी आणि जागृत बेट क्षेत्रामुळे अत्यंत समृद्ध असा प्राचीन धार्मिक वारसा लाभलेला परिसर आहे.कोपरगावचा प्रमुख प्राचीन धार्मिक वारसा मोठा असून त्यात कोकमठाण शिवमंदिर कोपरगावजवळील हे १२-१३ व्या शतकातील हेमाडपंती मंदिर स्थापत्यकलेचा उत्तम नमुना असून ते ‘भूमज’ शैलीत बांधलेले आहे.तर बेट कोपरगाव येथे गोदावरीच्या दोन प्रवाहांच्या मध्ये वसलेले हे बेट अत्यंत जागृत धार्मिक स्थान आहे.येथे कचेश्वर आणि शुक्लेश्वर अशी पुरातन मंदिरे आहेत.त्याच ठिकाणी गोदावरीच्या काठावर असलेला,महाशिवरात्रीला विशेष महत्त्व असलेला आणि ऐतिहासिक संजीवनी मंत्राची परंपरा सांगणारा ‘संजीवनी पार’ हे जागृत धार्मिक केंद्र आहे.याशिवाय अलीकडील काळात शिर्डीला जाण्यापूर्वी साईबाबांनी या भागात वास्तव करून दीर्घकाळ तपश्चर्या केली होती,त्यामुळे कोपरगावला साई भक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे.या शिवाय कोपरगाव शहरात पेशवेकालीन वाडे,विशेषतः राघोबादादा पेशव्यांचा वाडा,हा मराठा स्थापत्यशैलीचा एक दुर्लक्षित पण महत्त्वाचा वारसा आहे.गोदावरी नदी या भागात काही ठिकाणी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते,ज्यामुळे या ठिकाणाचे धार्मिक महत्त्व अधिक वाढते.अशा या पवित्र ठिकाणी कोपरगाव येथे अलीकडील काळात भाविक भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी मुंबादेवी तरुण मंडळ व साई गाव पालखी ३६ वर्षापासून आयोजित विविध धार्मिक सोहळे मोठी मेजवानी ठरत असताना दिसत आहे.त्याचा उत्तरोत्तर वाढ होताना दिसत आहे.(त्यामुळे आता अनेक पुढारी या मंडळाचे अनुकरण करताना दिसत आहेत.)शेवटच्या राम नवमीच्या दिवशी शिर्डीच्या दिशेने मोठा साई पालखी सोहळा निघत असतो.तो उत्सव शिर्डीला येणारा सर्वात मोठा उत्सव मानला जातो.

श्री क्षेत्र हरिद्वार येथील प्रसिद्ध आचार्य शिरीषजी महाराज.

   या पूर्वी साई गाव पालखी सोहळा आणि मुंबादेवी तरुण मंडळाच्या वतीने या पूर्वी रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांची रामायण कथा,बाबा महाराज यांचे संत चरित्र,केशव  महाराज उखळीकर यांची भागवत कथा,गणेशानंद महाराज यांचे देवी भागवत कथा,संत द्यानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज चरित्र,विवेक बुवा गोखले यांचे दत्त महात्म्य,शिव पुराण कथासार,केशव महाराज उखळीकर यांची श्री कृष्ण लीला,अनुराधा दीदी यांची बाबाजी भगवान कथा,चारुदत्त आफळे यांचे विष्णू महापुराण कथा आदी लोकप्रिय उपक्रम मोठमोठे विक्रम मोडत हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.तर यावर्षी मुंबादेवी तरुण मंडळ आणि साई गाव पालखी यावर्षी नवनाथ कथा सार सांगण्यासाठी हरिद्वार येथून आचार्य श्री शिरीषजी महाराज हे नववर्षाच्या आणि पाडव्याच्या मुहूर्तावर येत आहे.त्यासाठी मोठी तयारी  केली जात असून ती अंतिम टप्प्यात आली आहे.

   धुंडिसुत मालू कवी विरचित “श्री नवनाथ भक्तिसार ” हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथाचा प्रमाणग्रंथ मानला जातो.मालू कवी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधिपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे.हा ग्रंथ इ.स.-१८१९-२० च्या दरम्यान लिहून पूर्ण केला असे मानले जाते.या ग्रंथात ४० अध्याय असून ओवीसंख्या ७६०० आहे.या ग्रंथात नवनारायणांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने धारण केलेल्या नवनाथांच्या कथा आहेत.भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरुन कवी नारायणाने मच्छिंद्र हे नांव धारण केले,हरीने गोरक्ष,अंतरिक्षाने जालंधर,प्रबुद्धाने कानिफ,पिप्पलायनाने चरपट,आविहोंत्राने नागेश,दुमिलाने भरतनाथ,चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली यात मच्छिंद्रनाथ हे प्रमुख नाथ मानले जातात.जात पंथ यांच्या पलीकडे जाऊन या नवनाथांनी आपल्या चमत्कारांनी जनसामान्यांना आकर्षित करून नाथपंथाचा प्रसार केला अशी भाविकांची मोठी श्रद्धा आहे.त्यांच्या दिव्य चरित्रामुळे घोर तप,अनन्य गुरुभक्ती,अपूर्व भक्तीभाव,ब्रम्हचर्याचे नैश्ठीक पालन या सगुणांच्या जोरावर आपल्याला कोणतीही अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करून घेता येवू शकते हि गोष्ट आपणास पटते.ज्ञानेश्वरी च्या खालोखाल चिंतन,मनन व पारायण यांसाठी “नवनाथ भक्तिसार” हा ग्रंथ सुपरिचित आहे.”गोरक्ष किमयागार” या अप्राप्य ग्रंथाच्या आधाराने धुंडिसुत मालू यांनी हा अद्भुत ग्रंथ सिद्ध केला आहे.या ग्रंथाचे पारायण वेगवेगळ्या पद्दतीने केले जाते.बरेच लोक या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करतात.तर बरेच भाविक या ग्रंथाचे दैनिक पारायण करतात.या ग्रंथ वाचनाने ऐहिक उत्कर्ष आणि पारलौकिक कल्याण असे दोन्हीही हेतू साध्य होत असल्याची धारणा समाजात मोठ्या प्रमाणावर आजही आहे.याचा प्रत्यक्ष अनुभव अनेक श्रेष्ठ भक्तांना आला आहे.कोपरगाव येथील ज्ञानेश्वर नगरीत तो पुन्हा एकदा हरिद्वार येथून आलेले आचार्य श्री शिरीषजी महाराज यांचे सुश्राव्य वाणीतून भाविकांना ऐकावयास मिळणार आहे.त्यामुळे यासाठी मोठी गर्दी होणार हे भाविकांना वेगळे सांगण्याची गरज उरत नाही.त्यासाठी हा तहसील मैदानाचा परिसर पुन्हा एकदा भाविकांनी फुलणार आहे.

  दरम्यान या  कार्यक्रमानिमित्त गुरुवार दिनाक १९ मार्च रोजी पहाटे ०५ वाजता तर पहाट पाडवा संपन्न होत आहे.सकाळी ०७ वाजता,’आम्ही साईंच्या लेकी’ यांच्या वतीने महिला अभिवादन यात्रा सकाळी ०७ वाजता संपन्न होत आहे.तर रविवार दिनाक 22 मार्च रोजी सकाळी ०९ वाजता आनंद ऋषी हॉस्पिटल अहिल्यानगर व ज्येष्ठ नागरिक मंच यांचे वतीने मोफत नेत्र शिबिर अजमेरे हॉस्पिटल श्रीराम मंदिर रोड या ठिकाणी संपन्न होणार आहे.बुधवार दिनाक २५ मार्च पासून अखंड साई चरित्र पहाटे ४.३० पासून संपन्न होणार आहे.तर गुरुवार दि.२६ मार्च रोजी दुपारी २.५५ वाजता साई पालखीचे प्रस्थान शिर्डी कडे होणार आहे.तर दिनाक २७ मार्च रोजी सकाळी ०९ वाजता काळ्याचे कीर्तन संपन्न होणार आहे.त्यानंतर उपस्थित भाविकांना महा प्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.भाविकांनी या धार्मिक कार्याचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close