धार्मिक
…या गावी महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा सोहळा

न्यूजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील प्राचीन महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार व प्राण प्रतिष्ठा सोहळा बुधवार दि.०४ मार्च रोजी संपन्न होणार असून गुरुवार दि.०५ मार्च रोजी
गोदाधाम (सरला बेट) येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे जाहीर हरी कीर्तन संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

महालक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य,शांती,सत्य व समृद्धी,संपत्ती,सौंदर्य अधिष्ठात्री देवी आहे.ती सरस्वती,लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे.लक्ष्मी विष्णुची पत्नी आहे,लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते.
महालक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य,शांती,सत्य व समृद्धी,संपत्ती,सौंदर्य अधिष्ठात्री देवी आहे.ती सरस्वती,लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवीपैकी एक आहे.लक्ष्मी विष्णुची पत्नी आहे,लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते.हिंदू धर्मात विष्णु व भागवत पुराण लक्ष्मीच्या कथांनुसार,देव-दानवांनी अमृत प्राप्तमंथनातून निघालेल्या अन्य रत्नांसोबत सागरातून उत्पन्न झाली असल्याचे मानले जाते.ही समुद्रदेव तिरंगिनी देवी यांची कन्या मानली जाते.ज्या विष्णू भगवंतांनी भूतलावर अवतार घेतला,त्याची पत्नी लक्ष्मी होती.पुढे तीने कृष्णाची सहचरी होण्यासाठी भूतलावर अवतार घेतला होता.देवी लक्ष्मीनारायण (विष्णु) रामावतारात ती सीता बनली होती.कृष्णावतारात ती रुक्मिणीच्या रूपात अवतरली तर दक्षिण पश्चिम तिरुपती बालाजी अवतारात ती पद्मावती होती.तिचा गावोगाव वास असल्याचे मानले जाते.त्यामुळे गावोगावी तिचे मंदिरे असल्याचे दिसून येत आहे.
भोजडे हे कोपरगाव तालुक्यातील गाव त्याला अपवाद नाही.याठिकाणी प्राचीन मंदिर आहे.त्याचा ग्रामस्थानी लोकवर्गणी करून जीर्णोद्धार केला आहे.त्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा आगामी 04 मार्च रोजी संपन्न होत आहे.

दरम्यान या निमित्ताने श्री.महालक्ष्मी माता मूर्ती भव्य मिरवणूक बुधवार दि.०४ मार्च रोजी सकाळी ०८ वाजता श्री.महालक्ष्मी माता मंदिर येथून निघणार आहे.यावेळी संकल्प पुण्याहवाचण,देवता आवाहन व नवग्रह स्थापना,नवग्रह हवन व मूर्तीस जलाधिवास प्रातः पुजन,पौक्षिक होम प्रथाण हवण,घराय होम मुतीरा १०८ कुभात्मक स्नान,मूर्तीस धान्यादी बारा,आरती उत्तरांग हवण,बलिदान,पुर्णाहुती,मूर्ती स्थापना,प्राणप्रतिष्ठा,महानैवेद्य आरती संपन्न होणार आहे.दरम्यान सरला बेट येथील महंत रामगिरीजी महाराज यांचे गुरुवार ५ मार्च रोजी यांचे जाहीर हरी किर्तन दुपारी ०३ वाजता संपन्न होणार असून त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप होणार आहे.या कार्यक्रमासाठी भोजडे आणि परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने शेवटी करण्यात आले आहे.



