धार्मिक
भगवान शिव हा भोळा आणि भक्तांना पावणारा-..या महाराजांचे प्रतिपादन

न्यूजसेवा
संवत्सर-(प्रतिनिधी)
भगवान शिव हा भोळा आहे आणि भक्तांना पावणारा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर यांनी कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“ध्यानस्थ बसलेल्या शिवाची मूर्तीचा शिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे,जो जीवनात आणि जगामध्ये “अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे” स्मरण आहे.या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात”-ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर.
कोपरगाव तालुक्यातील श्री क्षेत्र संवत्सर या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त व शृंगेश्वर महाराज यात्रेनिमित्त ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर यांचे जाहीर हरी किर्तन मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे.त्यावेळी ते बोलत होते.

महाशिवरात्री हा एक हिंदू सण आहे,जो दरवर्षी फेब्रुवारी ते मार्च दरम्यान श्री शिवांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो.हिंदू दिनदर्शिकेनुसार हा सण फाल्गुन महिन्याच्या पूर्वार्धाच्या चौदाव्या दिवशी साजरा केला जातो.हा सण श्री शिव आणि श्री पार्वतीच्या लग्नाचे स्मरण करतो.आणि या प्रसंगी शिव त्याचे दैवी तांडव नृत्य करतात.देशातील बारा ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मोठ्या भक्तिभावाने यात्रा भरते आणि भक्त दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावताना दिसत असतात.कोपरगाव तालुक्यातील कोपरगाव बेट येथील काशी विश्वनाथ मंदिर,जनार्दन स्वामी मंदिर,सद्गुरू शुक्राचार्य मंदिर या ठिकाणी यावर्षी संजीवनी पार आणि परिसरातील मंदिरांचा जीर्णोद्धार केल्याने ते भाविकांचे आकर्षण ठरले असल्याचे दिसून आले आहे.तर कुंभारी येथील राघवेश्वर मंदिर,मंजूर येथील सिद्धेश्वर शिव मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.त्याला कोपरगाव संवत्सर येथील शृंगेश्वर मंदिर अपवाद नव्हते या ठिकाणी आज दिवसभर भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.संवत्सर येथील ग्रामस्थानी ह.भ.प.शिवाजी महाराज भालुरकर यांचे हरी कीर्तन आयोजित केले होते.त्यावेळी ते बोलत होते.

सदर प्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,चंद्रकांत लोखंडे,लक्ष्मणराव साबळे,लक्ष्मण परजणे,दिलीप ढेपले,बाळासाहेब गायकवाड,अनिल आचारी,भिकन करपे,पावडे बाबा,सुभाष बिडवे,शिवाजी ठाकरे,वाल्मीक महाराज,रावसाहेब भाकरे,श्री काजळे,श्री मलिक महाराज आदिसंह भोजडे,कान्हेगाव,कासली,पढेगाव,कोकमठाण आदी ठिकाणावरून अनेक भाविक व भजनी मंडळ बहुसंख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”ध्यानस्थ बसलेल्या शिवाची मूर्तीचा शिवरात्री हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा सण आहे,जो जीवनात आणि जगामध्ये “अंधार आणि अज्ञानावर मात करण्याचे” स्मरण आहे.या दिवशी श्री शिवाचे स्मरण करतात आणि प्रार्थना,उपवास,नैतिकता आणि सद्गुणांचे मनन करून साजरा केला जातो.यावेळी महाराजांनी शिव महिमा वर्णन केले शिव हा भोळा आहे भक्तांना पावणारा आहे म्हणून सर्वांनी शिवाजी पूजा करावी लोटाभर जल व बेल पान शिवाला आवडतात ते अर्पण करावे भोळ्या भावड्या लोकांना शिव पावतो त्याचे अनेक दाखले महाराजांनी यावेळी वर्णन केले शिवरात्रीच्या दिवशी भजन कीर्तन करावे तीच शिवाय साठी चांगली सेवा आहे असे महाराजांनी शेवटी सांगितले आहे.
दरम्यान याप्रसंगी शिवाजी महाराज भालूरकर व शिवाजी महाराज ठाकरे यांचा वाढदिवस या ठिकाणी उपस्थित त्यांच्या वतीने साजरा करण्यात आला व त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.



