जाहिरात-9423439946
धार्मिक

महाशिवरात्रीनिमित्त येथेविविध कार्यक्रमांचे आयोजन

न्यूजसेवा

संवत्सर -(शिवाजी गायकवाड)

  धार्मिक व पौराणिक महत्व असलेल्या संवत्सर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी रविवार दि. १५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर यांचा किर्तनाचा कार्यक्रम श्री शृंगेशवर महाराज मंदिराच्या प्रांगणात सकाळी ९ ते ११ या वेळेत होणार आहे.तसेच सायंकाळी ५.३० वाजता मंदिरापासून ते पालखी मार्गाने श्री शृंगेश्वर महाराजांची पालखीची मिरवणूक निघणार आहे.या सर्व धर्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

शृंग ऋषी,संवत्सर.

  दरम्यान या ठिकाणी प्राचीन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषीना पाचारण केले होते.त्यानंतर भगवान श्रीराम,लक्ष्मण,भरत शत्रुघ्न आदी पुत्रलभ राजा दशरथ यांना झाला होता.त्या शृंगऋषींचे भव्य मंदीर संवत्सरला गोदावरी काठावर आहे.याशिवाय महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदीरही गोदावरी काठावर आहे.याला खूप मोठे महत्व आहे.

   महाशिवरात्री निमित्त पहाटे कावडीच्या पाण्याने महादेवाच्या पिंडीला स्नान घालून महाअभिषेक सोहळा पार पडणार आहे. तर सायंकाळी श्री शृंगेश्वर महाराजांची पालखीची मिरवणूक निघणार आहे.श्री शुंगेश्वर महाराज मंदिराच्या परिसरातील पटांगणामध्ये वेगवेगळे व्यावसायिक व फळ,भाजीपाला विक्रेते,शेतकरी व व्यापाऱ्यांच्या दुकाना थाटल्या जातात.त्यात विविध खेळणी,मिठाई,प्रसाद,कपडे अशा दुकानांचा सहभाग असतो.यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी विचारात घेऊन संवत्सर ग्रामपंचायतीमार्फत चांगले नियोजन करण्यात आलेले आहे.उन्हाळ्याचे दिवस असल्याने भाविकांना पिण्याच्च्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. याशिवाय शिर्डी येथील गाईवाले मित्रमंडळाचे संतोष वाघ व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद भाविकांसाठी ठेवण्यात आलेला आहे.

  संवत्सर या गांवाला पौराणिक व धार्मिक महत्व असल्याने महाशिवरात्रीनिमित्त अनेक भाविक पुरुष महिला व बालगोपालांच्या गर्दीने गोदाकाठाला पंढरपुराचे स्वरूप येते.पुरातन काळात राजा दशरथाने श्रीरामाच्या जन्माच्यावेळी पुत्रकामेष्टी यज्ञ करण्यासाठी ज्या शृंगऋषीना पाचारण केले होते त्या शृंगऋषींचे भव्य मंदीर संवत्सरला गोदावरी काठावर आहे.याशिवाय महानुभाव पंथीय श्रीकृष्ण मंदीरही गोदावरी काठावर आहे. पलिकडच्या तिरावर कोकमठाण परिसरात पुरातन महादेवाचे हेमाडपंथी मंदीर देखील आहे.अशा धार्मिक स्थळांमुळे संवत्सरला आगळे वेगळे महत्व प्राप्त झालेले आहे.

दरवर्षी महाशिवरात्र आणि ऋषीपंचमी हे उत्सव गोदावरी काठावर श्री शृंगेशराच्या मंदिराजवळ मोठ्या उत्साहाने धार्मिक कार्यक्रम केले जातात.या वर्षी देखील रविवार दि.१५ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्र मोठ्या उत्साहात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरी होणार असून भाविकांनी या सर्व कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभघ्यावा असे आवाहनही संवत्सर ग्रामस्थांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close