धार्मिक
…या ठिकाणी दत्त जयंती उत्साहात संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव शहराचे उपनगर असलेल्या ओमनगर,गिरमे कॉलनी येथे मित्र फाउंडेशनच्या वतीने श्री दत्त जयंती रौप्य महोत्सवी उत्सव सोहळा सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली असून याचा जवळपास चार हजार भाविकांनी लाभ घेतला असल्याची माहिती मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष वैभव गिरमे व माजी नगरसेविका दिपा गिरमे आदींनी दिली आहे.

“यावेळी भाजपच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे,भाजप उमेदवार पराग संधान,निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार,कार्यकर्ते,दत्त भक्त आदींची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला आहे”-वैभव गिरमे,संस्थापक,मित्र फाऊंडेशन,ओमनगर,कोपरगाव.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,”मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी श्री भगवान दत्ताचा जन्म झाला,म्हणून त्या दिवशी दत्ताचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो.यंदा ओमनगर येथे दत्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.या दिवशी दत्ताची मनोभावे नामजपादी उपासना केल्यास दत्त तत्त्वाचा अधिकाधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते,अशी समाज मान्यता आहे.ब्रह्मा,विष्णू आणि महेश या त्रिदेवांचे स्थान सर्वोच्चपरी आहे.या तिन्ही देवांचे अंश म्हणजेच श्री गुरुदेव दत्त मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेला दत्त व्रत व दत्त दर्शन केल्याने भक्तांच्या सर्वमनोरथ पूर्ण होतात,अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

कोपरगाव आणि परिसरात दत्त भक्तांचा मोठा परिवार आहे.यावर्षी या उपक्रमाचे पंचविसाचे वर्षे होते.त्यामुळे उपस्थितांत मोठा उत्साह आढळून आला आहे.यापूर्वी प्रत्येक दत्त जयंती शहरातील ओमनगर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.त्यासाठी येथील गिरमे कॉलनी येथील मित्र मंडळाचे अध्यक्ष वैभव गिरमे आदींनी दत्त भक्तांच्या सहाय्याने हा उत्सव साजरा केला आहे.

यावेळी भाजपच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे,भाजप उमेदवार पराग संधान,निवडणूक लढवत असलेले भाजपचे उमेदवार,कार्यकर्ते,दत्त भक्त आदींची प्रमुख उपस्थिती होती.दरम्यान यावेळी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचा लाभ देण्यात आला आहे.या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



