धार्मिक
…या गावात श्रीमद् भागवत कथा संपन्न

न्यूजसेवा
संवत्सर- (प्रतिनिधी)
स्व.गं.भा.हौशाबाई दगडू नेहे व कै.कारभारी दगडू नेहे यांच्या प्रथम पुण्यस्मरण निमित्ताने सर या ठिकाणी सात दिवस श्रीमद् भागवत कथा संवत्सर गावात सात दिवस ह.भ.प. कैवल्य महाराज जोशी यांनी मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.तर आज रोजी ह.भ.प.मधुसूदन महाराज मोगल यांनी काल्याचे किर्तन रुपी सेवा दिली असल्याचे माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे.

“भागवत कथा ज्यांच्यासाठी केली त्यांना मोक्षप्राप्ती होईल त्याचबरोबर ज्यांनी ऐकली त्या सर्वांना त्याचा वृद्धापकाळात लाभ होईल.त्याचबरोबर आई-वडिलांची सेवा करा त्यातच खरा परमेश्वर आहे”- मधुसूदन मोगल महाराज.
यावेळी त्यांनी कृष्णजन्म या विषयावर किर्तन केले असून त्यांच्या जन्मापासूनच्या लीला आपल्या सुश्राव्य वाणीतून उपस्थित भाविकांना विदित केल्या आहेत.कंस राजाने ज्यावेळेस मथुरेमध्ये विध्वंस केला व आपल्या बहिणीच्या मुलांचा मारून वध केला त्यानंतर मथुरेत श्रीकृष्णाचा जन्म झाला व त्यांनी कंसाला ठार मारून सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून दिला असल्याचे सांगितले आहे.भागवत कथा ज्यांच्यासाठी केली त्यांना मोक्षप्राप्ती होईल त्याचबरोबर ज्यांनी ऐकली त्या सर्वांना त्याचा वृद्धापकाळात लाभ होईल.त्याचबरोबर आई-वडिलांची सेवा करा त्यातच खरा परमेश्वर आहे असे मत मोगल महाराजांनी व्यक्त केले आहे.
यावेळी काल्याचे किर्तन म्हणून दहीहंडी सुद्धा उपस्थित महाराजांनी फोडली आहे.
याप्रसंगी गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,नाशिक जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष शिवाजीराव ढेपले,उपसरपंच विवेक भाऊ परजणे,लक्ष्मणराव साबळे,दिलीप ढेपले, वाल्मीक जाधव महाराज,चंद्रकांत लोखंडे,अनिल आचारी,भिकन करपे,पोपट करपे,बाळासाहेब गायकवाड,बाळासाहेब दहे आदिसंह गावातील भजनी मंडळ,राजेंद्र नेहे उपस्थित होते.यावेळी शंकर नेहे यांच्या वतीने ग्रामस्थ व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले आहे.