धार्मिक
… या हरिनाम सप्ताहास खा.वाकचौरे यांची सदिच्छा भेट!

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव येथे संपन्न होत असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात काल रात्री शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदिच्छा भेट दिली आहे. त्यांचा सप्ताह समितीच्या वतीने शाल हार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.

दरम्यान वेस येथे संपन्न होणाऱ्या सप्ताहात उद्या सकाळी १० वाजता भागवताचार्य नंदुरबार येथील ह.भ.प.द्यानेश्वर महाराज माळी यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.त्याचा वेस आणि परिसरातील भाविकांनी लाभ घ्यावा असे सप्ताह समितीने आवाहन केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील वेस सोयगाव येथे सालाबाद प्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह ह.भ. कानिफनाथ महाराज पोटभरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे.गुरुवार दिनाक सर्व ह.भ.प.अभिजित महाराज गिरी,अरुणनाथ गिरी महाराज,संपत महाराज भोर,मयूर महाराज पाचोरे,शुभम महाराज गायकवाड आदींचे किर्तन संपन्न झाले आहे, तर आज शिर्डी येथील काशीकानंद महाराज यांचे हरीकीर्तन संपन्न होत आहे.२८ ऑगस्ट रोजी प्रारंभ झालेल्या या सप्ताहात ग्रंथराज द्यानेश्वरी पारायण सोहळा होत असून रोज पहाटे ०४ वाजता काकडा भजन, सकाळी ०७ वाजता ध्यानेश्वरी पारायण सोहळा होत आहे. तर सायंकाळी ०५ वाजता हरिपाठ,रोज सायंकाळी ०७ वाजता राज्यातील मान्यवर प्रसिद्ध महाराजांचे हरी किर्तन संपन्न झाले आहे.रोज रात्री कीर्तनानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.तर उद्या सकाळी १० वाजता भागवताचार्य नंदुरबार येथील ह.भ.प.द्यानेश्वर महाराज माळी यांचे काल्याचे किर्तन सकाळी १० वाजता संपन्न होणार आहे.
दरम्यान या सप्ताहासाठी काल रात्री ०९ बाजेच्या सुमारास शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सदिच्छा भेट दिली आहे. त्यांचा सप्ताह समितीच्या वतीने शाल हार,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
त्यावेळी प्रास्तविक निळवंडे कालवा कृती समितीचे कार्यकर्ते अप्पासाहेब कोल्हे यांनी केले आहे.तर खा.वाकचौरे यांनी त्यांचा सत्कार जालिंदर कोल्हे यांनी केला आहे.
यावेळी उबाठा शिवसेनेचे जिल्हा ग्राहक मंचचे अध्यक्ष मुकुंद सिनगर,मेजर महेंद्र सोनवणे,माजी सरपंच माणिक दिघे,सुधाकर म्हाळसकर,चंद्रकांत पाडेकर,सतीश म्हाळसकर,अशोक गायकवाड,सचिन खामकर,राजेंद्र कोल्हे,साईनाथ कोल्हे,दत्तात्रय म्हाळसकर,सोमनाथ कोल्हे,विकास पाडेकर,हौशीराम पाडेकर,सोपान म्हाळसकर,सोपान गायकवाड,गणेश भाऊसाहेब कोल्हे,सुनील भाऊसाहेब गायकवाड आदी मान्यवर कार्यकर्ते,भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार विजय गोर्डे यांनी मानले आहे.