जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

सावता महाराजांनी कामातच देव पाहिला-जाधव महाराज

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

संवत्सर- -(प्रतिनिधी)

  कोपरगाव तालुक्यातील संवत्सर गावातील अनिल हरीभाऊ सोनवणे नवुचारी येथे श्री संत शिरोमणी सावता माळी महाराज संजीवन समाधी सोहळा विविध उपक्रमांनी तसेच ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आला.

  • कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन पदी राजेंद्र सखाहरी परजणे व महाराष्ट्र माळी समाज महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल हरीभाऊ सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव यांच्या हस्तेसत्कार करण्यात आला आहे.

   आयोजित केलेल्या प्रवचन प्रसंगी ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव बोलताना म्हणाले की,”कांदा मुळ्यांची शेती फुलवून खरा भक्ती मार्ग दाखविणारे संत सावता महाराजांचे कार्य महान आहे.त्यांनी जीवनात कर्माला महत्त्व दिले.कामातच त्यांनी देव पाहिला.पंढरपूरला ते गेले नाहीत,मात्र त्यांच्या भक्तीने साक्षात पांडुरंग त्यांना भेटावयास आले.कर्तव्य,कर्म करीत राहणे ही एक प्रकारे ईश्‍वरी सेवा असल्याचा संदेश त्यांनी दिला.प्रवचन नंतर ज्ञानामृत श्रवणाचा व महाप्रसादाचा जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घेतला.


अखील भारतीय श्री संत सावता माळी युवक संघ जिल्हाध्यक्ष मुकुंद मामा काळे,योगेश ससाणे,कैलास सोनवणे,नामदेव सोनवणे,अनिल सोनवणे,वसंतराव सोनवणे यांनी या कार्यक्रमासाठी नियोजन केली होते.

  कोपरगाव संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन पदी राजेंद्र सखाहरी परजणे व महाराष्ट्र माळी समाज महासंघ कोपरगाव तालुकाध्यक्ष पदी अनिल हरीभाऊ सोनवणे यांची निवड झाल्याबद्दल ह.भ.प.वाल्मिक महाराज जाधव व जमलेल्या सर्व भाविक भक्तांच्या वतिने सत्कार करण्यात आला.

गोदावरी दुध संघ अध्यक्ष राजेश परजणे,कोल्हे सहकारी साखर कारखाना संचालक ज्ञानेश्वर बापु परजणे,पांडुरंग शिंदे,त्रिबंक परजणे,शिवाजी बारहाते,फकीरराव बोरनारे,संजीवनी सहकारी पतसंस्था चेअरमन राजेंद्र परजणे,संवत्सर ग्रामपंचायत सरपंच सुनिल ढेपले,मा.सरपंच वाल्मिकराव निकम,उपसरपंच विवेक परजणे,भरत बोरनारे,विद्यमान सदस्य महेश परजणे,कोपरगाव पंचायत समिती सदस्य कैलास संवत्सरकर,चंद्रकांत कासार,शशिकांत आगवन,नंदकुमार जगताप,दीनेश बोरनारे,गोविंद परजणे,संदीप मैंद,राजेंद्र बोरनारे,दीलीपराव कासार,मोहन निकम,पाटबंधारे अधिकारी सचिन ससाणे,पावडे बाबा,ढेपले मामा,लक्ष्मण साबळे,अशोक शिंदे व नंदुभाऊ आचारी यांच्यासह आदि पदाधिकारी,कार्यकर्ते,समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close