जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घेतले कोपरगावात दर्शन !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरांतील प्राचीन समजल्या जाणाऱ्या दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिरात नुकतेच हिमाचल राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या कन्या डॉ.आस्था मुकेश अग्निहोत्री यांचेसह आपल्या मंत्री गणांसह दर्शन घेतले आहे.

दैत्य गुरु शुक्राचार्य मंदिरात नुकतेच हिमाचल राज्याचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या कन्या डॉ.आस्था मुकेश अग्निहोत्री यांचेसह आपल्या मंत्री गणांसह दर्शन घेतले.

.

दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे.दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्राचार्यांचे एकमेव मंदिर आहे.या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरू शुक्राचार्य मंदि‍रात शुभकार्य,वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही,असे हे जगातील एकमेव मंदि‍र असल्याची मान्यता आहे.त्यामुळे विवाह कार्य करण्यास या ठिकाणी दूरदूरून अनेक कुटुंबे आणि जोडपे येत असतांत.

  महाराष्ट्राला ऐतिहासिक आणि पौराणिक वारसा लाभला आहे.राज्यातील विविध भागात अनेक प्राचीन मंदिरे आहेत.या प्रत्येक मंदिराचा एक वेगळा इतिहास आहे.तुम्हाला देव-दानव आणि त्यांच्यातील युद्धाबाबत माहिती प्राचीन ग्रंथात आहे.देवांचे गुरू होते बृहस्पती तर दैत्याचे गुरू शुक्राचार्य होते अशी पुराणात नोंद आहे.दैत्यगुरु शुक्राचार्य यांचे एकमेव मंदिर महाराष्ट्रात आहे.दंडकारण्य म्हणून प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यात शुक्राचार्यांचे एकमेव मंदिर आहे.या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे या गुरू शुक्राचार्य मंदि‍रात शुभकार्य,वि‍वाह करण्‍यास कोणताही मुहूर्त लागत नाही,असे हे जगातील एकमेव मंदि‍र असल्याची मान्यता आहे.त्यामुळे विवाह कार्य करण्यास या ठिकाणी दूरदूरून अनेक कुटुंबे आणि जोडपे येत असतांत.या ठिकाणी नुकतेच हिमाचलचे उपमुख्यमंत्री मुकेश अग्निहोत्री यांनी आपल्या कन्या डॉ.आस्था मुकेश अग्निहोत्री यांचेसह आपल्या मंत्रीगण आदींनी दर्शन घेतले आहे.

सदर प्रसंगी दैत्य गुरु शुक्राचार्य ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,बाळासाहेब शिंदे,हेमंत पटर्वधन,कैलास आव्हाड,मधुकर साखरे,मुला आव्हाड,भागचंद रुईकर,दिलीप सांगळे,विकास शर्मा,बाबा आव्हाड,विनोद नाईकवाडे,किरण आहाड,विजय रोहम,बाबासाहेब कापे,आप्पा हाटार,रामनाथ कदम,समिर आंबोरे,सुशांत घोडके,अभिषेक आव्हाड आदींसह बहुसंख्येने भाविक भक्त उपस्थित होते.

  यावेळी डॉ.आस्था अग्निहोत्री यांच्या शुभ विवाहासाठी त्यांनी गुरू शुक्राचार्य यांना अभिषेक अर्पण केला आहे.मंदिर भेटी मध्ये त्यांनी मंदिरात झालेले बदल याच बरोबर महाराजांची सुंदर व प्रसन्न मूर्तीची मुक्त कंठाने स्तुती केली आहे.आपल्या मंदिर भेटीचा आवर्जुन उल्लेख हिमाचल प्रदेश मध्ये करणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री यांनी केला असून त्यांनी मंदिर प्रशासनाने केलेले स्वागत व सत्कार या बद्दल आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close