धार्मिक
…या विद्यालयात आषाढी एकादशी संपन्न !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उमाताई वहाडणे व त्यांच्या सहकारी तसेच कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दिलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे तसेच स्थानिक स्कुल कमेटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,डॉ.अमोल अजमेरे,आनंद ठोळे,राजेश ठोळे,संदीप अजमेरे आदि उपस्थित होते.

आषाढी एकादशीच्या दिवशी संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराजांनी भगवान पांडुरंगाला तेथील राजा कृष्णदेवराय यांचीविजयनगरची राजधानी असलेल्या हम्पी येथून एक चमत्कार घडवून सोडवून आणले होते अशी समाज मान्यता आहे.त्यामुळे या दिवशी पुन्हा एकदा पांडुरंगाची मूर्ती पंढरपूर येथे विराजमान झाली होती.त्यामुळे ५०० वर्षापूर्वी हा उत्सव बनला होता तो आजतागायत सुरू आहे.
महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येतात.कारण याच दिवशी संत एकनाथ महाराज यांचे पणजोबा संत भानुदास महाराजांनी भगवान पांडुरंगाला तेथील राजा कृष्णदेवराय यांचीविजयनगरची राजधानी असलेल्या हम्पी येथून एक चमत्कार घडवून सोडवून आणले होते अशी समाज मान्यता आहे.त्यामुळे या दिवशी पुन्हा एकदा पांडुरंगाची मूर्ती पंढरपूर येथे विराजमान झाली होती.त्यामुळे ५०० वर्षापूर्वी हा उत्सव बनला होता तो आजतागायत सुरू आहे.हिलाच आषाढी वारी म्हणतात.चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात.आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून संत गजानन महाराजांची,आळंदीहून ज्ञानेश्वरांची,देहूहून तुकारामांची,त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची,मुक्ताईनगर येथून मुक्ताबाई यांची,उत्तर भारतातून कबीरांची,श्री गांगागिरीजी महाराज यांची सरला बेटातून पालखी येते.या शिवाय राज्य भरातून हजारो पालख्या या दिवशी दर्शनासाठी येत असतात.ज्यांना येणे शक्य होत नाही अशी भक्त मंडळी गावात असलेल्या विठ्ठल मंदिरात दिंडीचे आयोजन करतात.कोपरगाव येथील श्रीमान गोकुळचंद विद्यालयात हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे.

यावेळी सर्व सहभागी विद्यार्थ्यांना त्यांनी एकादशी निमित्त शुभेच्छा दिल्या.उमाताई वहाडणे यांनी आषाढी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची माहिती सादर करुन त्यांची प्रतिमा विद्यालयास भेट दिली.मुख्याध्यापक रघुनाथ लकारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले आहे.उपमुख्याध्यापक अनिल अमृतकर,पर्यवेक्षक बलभीम उल्हारे,दीलीप तुपसैंदर,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संताची,विठ्ठल-रुक्मिणी,संत मीराबाई संत जनाबाई संत निवृत्तीनाथ,संत तुकाराम,विविध वारकऱ्यांची वेशभूषा साकारली.या सहभागी विद्यार्थ्यांना संस्थेचे सचिव दिलीप अजमेरे यांनी रोख पारितोषिके दिली आहे.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे कलाशिक्षक अतुल कोताडे,योगेश गवळे,श्री.डोळे यांनी विद्यार्थींना मार्गदर्शन केले आहे.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुलदीप गोसावी यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी होण्या करीता पंकज जगताप,श्रीकांत डांगे,संजय बर्डे,कलाशिक्षिका अजमेरे मॅडम यांनी विशेष परिश्रम घेतले होते.