कामगार जगत
..या कारखान्याकडून ऊसतोड कामगारांसाठी ‘शिबीर’ संपन्न

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सन -२०२५-२६ च्या गाळप हंगामात उसतोडणी करण्यासाठी आलेल्या सर्व ऊस तोडणी कामगारांची ‘उन्नती शिबीर’ अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक गोळ्या औषधाचे मोफत वाटप करण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक एस.एस.बोरनारे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामा बरोबरच उद्योग समुहाचा देखील एक महत्वाचा घटक आहे.ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते यासाठी या शिबिराचे प्रयोजन होते”-सोमनाथ बोरनारे,कार्यकारी संचालक,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना,गौतमनगर.
ज्या कामगारांची भरती मुकादमामार्फत हंगामी स्वरूपाची भरती होते व जे कामगार ऊसतोडणीसाठी विविध भागातून एकत्र येतात व कोयत्याद्वारे ऊसतोडणी,साळणी, मोळ्या बांधून ट्रक,ट्रॅक्टरमध्ये भरणी करतात वा बैलगाडीने कारखान्यामार्फत वाहतूक करतात व ज्या कामगारांची कारखान्यावर जबाबदारी नसते,अशा कामगारांना ‘ऊसतोडणी कामगार’ म्हणून सोबधले जाते.त्यांचा आणि त्यांच्या मुलांच्या आरोग्याची समस्या गंभीर असते त्यासाठी ही शिबिरे आयोजित करण्यात येत असतात.
कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वास्तव्यास असलेल्या ऊस तोडणी कामगारांच्या वसाहतीमध्ये मोफत सर्व रोग निदान आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे याच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना कार्यकारी संचालक सोमनाथ बोरनारे म्हणाले की,”ऊस तोडणी कामगार साखर कारखान्याच्या गळीत हंगामा बरोबरच उद्योग समुहाचा देखील एक महत्वाचा घटक आहे.ऊसतोड कामगारांना ऊस तोडणीच्या अतिशय कष्टाच्या कामामुळे स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष देता येत नाही.त्यामुळे भविष्यात मोठ्या आजारांना सामोरे जावे लागू शकते.त्यामुळे कारखान्याचे कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी मोफत सर्व रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येते.याहीवर्षी उन्नती शिबिराच्या माध्यमातून ऊसतोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून तपासणी अंती निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येणार आहे.ऊस तोडणी कामगारांनी व त्यांच्या कुटुंबियांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमितपणे न चुकता घेवून आपले व आपल्या कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन केले.या आरोग्य शिबिरात ऊस तोडणी कामगारांचे रक्तदाब,रक्तातील साखरेचे प्रमाण,गरोदर महिलांची व लहान मुलांच्या विविध आरोग्य तपासण्या करण्यात आल्या.
या मोफत आरोग्य तपासणी उन्नती शिबीर प्रसंगी कारखान्याचे महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संदीप शिरसाठ,शेतकी अधिकारी निळकंठ शिंदे,मुख्य वैद्यकीय डॉ.संदीप हरतवाल,डॉ.शैलेन्द्रकुमार जैन,डॉ.सागर रहाणे,डॉ.गणेश गावडे,डॉ.सोनाली मुरादे,शुभम देशमुख,अमोल गायकवाड,अर्चना कामले,खुशाल बनसोडे, वैभव सोळसे,कृष्णा जऱ्हाड,सीमा धेनक,शीतल म्हस्के,सुरेगाव उपकेंद्र अंतर्गत सर्व अशा सेविका उपस्थित होते.



