धार्मिक
…या शहरात जुन्या जोतीर्लिंगाचे दर्शन !

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री रवीशंकरजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून हजारो वर्ष जुन्या असलेल्या श्री सोरटी सोमनाथच्या मुळ ज्योतिर्लिंगाचे दर्शन हे माझे परमभाग्य असून श्री सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग आत्मबल आणि श्रद्धेचे प्रतिक असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

सोमनाथ मंदिर,ज्याला सोमनाथ मंदिर किंवा देव पाटण असेही म्हणतात,हे भारतातील गुजरातमधील प्रभास पाटण,वेरावळ येथे स्थित एक हिंदू मंदिर आहे.हे हिंदूंसाठी सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे आणि शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी ते पहिले मानले जाते.अनेक मुस्लिम आक्रमणकर्त्यांनी आणि राज्यकर्त्यांनी वारंवार नाश केल्यानंतर मंदिराची भूतकाळात अनेक वेळा पुनर्बांधणी करण्यात आली.
रविवार दि.२९ जून रोजी रोजी कोपरगाव शहरातील साईबाबा तपोभूमी येथील महात्मा गांधी चॅरीटेबल ट्रस्टच्या हॉलमध्ये परमपूज्य श्री श्री रवीशंकरजी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने व आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या माध्यमातून आणण्यात आलेल्या भगवान श्री सोरटी सोमनाथाचे मुळ ज्योतिर्लिंग भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आले होते.यावेळी आ.आशुतोष काळे व गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका पुष्पाताई काळे यांनी श्री सोरटी सोमनाथच्या मुळ ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेतले त्या वेळी ते बोलत होते.
याप्रसंगी संत-महंत,विविध क्षेत्रातील मान्यवर,आर्ट ऑफ लिव्हिंग व इस्कॉनचे सदस्य,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी,माजी नगरसेवक,कार्यकर्ते,कोपरगावकर व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रथम असलेले सोरटी सोमनाथ ज्योर्तिलिंग मंदिरावर शेकडो वर्षापूर्वी मेहमूद गजनीने १८ वेळा आक्रमण करून मंदिराला लुटले व ज्योतिर्लिंग खंडित केले.परंतु तामिळनाडूच्या काही अग्निहोत्री पंडितांनी या ज्योतिर्लिंगाचे अवशेष जोपासले आणि शेकडो वर्ष या ज्योतिर्लिंगाची पूजा अर्चना केली व हे पवित्र रहस्य सुरक्षित ठेवले आहे.श्री श्री रविशंकरजीयांच्या माध्यमातून है ज्योतिर्लिंग जगाच्या सर्व लोकांना दर्शनासाठी पुन्हा प्रकट झाले असून ह्या पवित्र सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे समस्त कोपरगावकरांबरोबरच मलाही दर्शनाचा लाभ मिळाला आहे.हे मंदिर आक्रमणांमध्ये अनेक वेळा उद्ध्वस्त झाले,पण प्रत्येक वेळी ते नव्याने उभे राहिले, सोमनाथ मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही,तर हे आपल्या श्रद्धेचे,संस्कृतीचे आणि इतिहासाचे जिवंत प्रतीक आहे.भगवान शिवाच्या चरणी नतमस्तक होऊन मी जनतेसाठी सुख,समृद्धी व चांगले आरोग्य मिळावे अशी प्रार्थना केली असल्याचे समजते.