धार्मिक
प्राणप्रतिष्ठेनिमित्त … या गावी पाच दिवस विविध कार्यक्रम

न्युजसेवा
संवत्सर (वार्ताहर)
कोपरगाव तालुक्यातील पूर्वेस सात कि.मी.अंतरावर असलेल्या संवत्सर येथील गोदावरी काठावरील श्री शृंगेश्वर ऋषींच्या मंदिरात श्री गणेश व श्री शृंगेश्वर ऋषी यांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा विधी तसेच मंदिरावर नवीन कलशारोहन सोहळा दि.११ ते १५ एप्रिल २०२५ दरम्यान राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.भाविकांनी या कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांनी केले.

मंगळवार दि.१५ एप्रिल रोजी भांबोली,ता.खेड येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगरचे ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे सकाळी ९.३० वाजता काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसाद कार्यक्रम होणार आहे.
सुमारे ४० वर्षापूर्वी स्थापीत करण्यात आलेली श्री शृंगेश्वर ऋषींची पूर्वीची मूर्ती भंग पावल्यामुळे ती मिरवणुकीने गोदावरी नदीमध्ये विसर्जीत करण्यात आली.आता नव्याने या मूर्तीसोबतच श्री गणेश मूर्तीचीही प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे.हा सोहळा भव्य दिव्य होण्याच्यादृष्टीने गांवातील कार्यकर्त्यांमधून समित्या नियुक्त करण्यात येऊन सोहळ्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली आहे.दि. ११ ते १५ एप्रिल २०२५ असे पाच दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात सोमवार दि. १४ एप्रिल २०२५ रोजी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख रमेशगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात येणार असून ग्रामपुरोहीत शैलेश जोशी गुरुजी हे या सोहळ्याचे पौरोहित्य करणार आहेत.
शुक्रवार दि. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता मूर्ती व कलशाची शोभायात्रा निघणार आहे. शनिवार दि.१२ एप्रिल रोजी शांतीसुक्त,प्रधान संकल्प,गणेश पूजन तसेच जलाधिवास,मंडप पूजन,अग्नी मंथन,ग्रह पूजन, मंगल आरती,आशीर्वाद,रविवार दि. १३ एप्रिल रोजी प्रातःपूजन, प्रधानहवन, स्थापनविधी,न्यासविधी,धान्ययाग,निद्रावाहनम, सायंपूजन,सोमवार दि.१४ एप्रिल रोजी उत्तरांग हवन, बलिदानविधी,मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा,पूर्णाहुती, महाआरती ब्रम्हवृंद सत्कार असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असून या धार्मिक सोहळ्यासाठी दररोज ११ जोडपी पूजा अर्चा करण्यासाठी बसणार आहेत.
मंगळवार दि. १५ एप्रिल रोजी भांबोली,ता.खेड येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज साक्षात्कार भूमी भामचंद्र डोंगरचे ह.भ.प.चैतन्य महाराज वाडेकर यांचे सकाळी ९.३० वाजता काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.पाच दिवस चालणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन संवत्सर ग्रामस्थांव्सावतीने करण्यात आले आहे.