धार्मिक
…या ठिकाणी महंत नारायणगिरिजी महाराज यांची होणार पुण्यतिथी !

न्युजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
उत्तर अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील गोदावरीतीरी असलेल्या श्री क्षेत्र सराला बेट या ठिकाणी मिती फाल्गुन कृ// ०८शनिवार दि.२२ मार्च २०२५ रोजी सकाळी १० वाजता ब्रह्मलीन संत नारायणगिरिजी महाराज यांची १६ वी पुण्यतिथी महंत रामगिरिजी महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाचे संपन्न होणार असल्याची माहिती विश्वस्त मंडळाने दिली आहे.

“संत नारायणगिरीजी महाराज यांचे इतका त्यागी,निःसीम संत होणे नाही.त्यांनी आपल्या धर्मपरायणतेत कुठलाही खंड पडू दिला नाही.पेक्षा आपल्या धार्मिक कार्यात कधी कोणापुढे लोटांगण घातले नाही उलट राजकीय नेते त्यांच्या जवळ आले तर अधिक कठोर झालेले अनेकवेळा पाहिले आहे.”आम्ही अखंड सप्ताहात लाह्या वाटून करू कोणावर विसंबून राहणार नाही” असे सुणवायला ते कधी कमी करत नसत”
ब्रम्हलिन संत नारायणगिरिजी महाराज यांना वैकुंठात जाऊन जवळपास सोळा वर्षे झाली आहे.मात्र त्यांचे समाजावरील गारूड आजही कायम असल्याचे पदोपदी जाणवते.इतका त्यागी,निःसीम संत होणे नाही.त्यांनी आपल्या धर्मपरायणतेत कुठलाही खंड पडू दिला नाही.पेक्षा आपल्या धार्मिक कार्यात कधी कोणापुढे लोटांगण घातले नाही उलट राजकीय नेते त्यांच्या जवळ आले तर अधिक कठोर झालेले अनेकवेळा पाहिले आहे.”आम्ही अखंड सप्ताहात लाह्या वाटून करू कोणावर विसंबून राहणार नाही” असे सुणवायला ते कधी कमी करत नसत.आपल्या कीर्तनातून ते “जरी संसाराच्या अंगी सर्व विषय व्यसने असली तरी आम्ही आमच्या प्रभू कीर्तनात रंगल्याने शुद्ध झालो आहोत.सारे त्रिभुवन सोवळे झाले शुद्ध झाले जीवनातील सारी विषमता आम्ही धुऊन काढली आहे.आम्ही जरी ह्या संसारात देह रूपाने असलो तरी आमचे मन ब्रह्मपुरी मध्ये अखंड वास करते आम्ही त्या विषय वासना रुपी दुर्गुणांचे तोंड बघत नाही आम्ही ह्या संसारात राहून हि एकांतात ब्रम्ही ब्रम्ह रस सेवन करतो अर्थात प्रभू प्रेमात मग्न राहतो.असे त्यांचे नेहमी वर्तन राहत असे.उपस्थित भाविकांना ते नेहमी सांगत,”आपला संसार करत असताना ईश्वराचे ही सतत स्मरण केले पाहिजे.आपल्या संसाराच्या अनुभवातून कर्म रुपी कुरु क्षेत्रात सतत लढा दिला पाहिजे त्या अर्जुना प्रमाणे आपल्या देह रुपी रथात आत्मिक स्वरूपात कर्म केले पाहिजे त्यासाठी इंद्रियरूपी घोड्यांना ईश्वरीय श्रेष्ठ श्रीमत द्वारा आपल्या बुद्धिरुपी लगाम चा उपयोग करून इंद्रिय संयम ठेवले पाहिजे त्या साठी ईश्वर ला सारथी ( साथी) साक्षी ठेवून प्रत्येक कर्म केले पाहिजे,असा साधकाचे प्रत्येक कर्म श्रेष्ठ कर्म होईल ते कधीच कनिष्ठ कर्म होणार नाही याची दक्षता घेणाऱ्या ज्ञानी पुरुषास निश्चित च मोक्ष प्राप्ती होईल.
त्यांच्या या इहलोकातून जाऊन सोळा वर्षे झाले यावर विश्वास बसत नाही.त्यांच्या पुण्यतिथी निमित्त श्रीक्षेत्र सराला बेट येथे त्यांचे उत्तराधिकारी महंत रामगिरिजी महाराज यांचे त्या निमित्ताने बेटात कीर्तन सेवा आयोजित केली असून त्याचा नाशिक,नगर,छ्त्रपती संभाजीनगर येथील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.त्यानिमित्ताने उपस्थित भाविकांना मांडे आणि पुरण-पोळीचा महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती संस्थांनचे अध्यक्ष व विश्वस्तांनी दिली आहे.