धार्मिक
…या ठिकाणी महाशिवरात्रीचे आयोजन

न्युजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव नजिक असलेल्या कोपरगाव बेट येथे या वर्षी शिवरात्रीच्या पावन पर्वावर शुक्राचार्य मंदिर ट्रस्टच्या वतीने आगामी माघ कृष्ण त्रयोदशी शके १९४६ दि.२६ फेब्रुवारी रोजी विविध कार्यक्रम संपन्न होत असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दरम्यान येथील भगवान महादेव यांच्या पवित्र पिंडीस चांदीचा मुलामा देण्यात येणार असून त्यासाठी प्रसिद्ध व्यापारी स्व.मोहनशेठ झंवर यांच्या स्मुर्ती प्रित्यर्थ सुमनताई झंवर यांनी सव्वा किलो चांदी दान स्वरूपात देऊ केली आहे”-बाळासाहेब आव्हाड,शुक्राचार्य मंदिर ट्रस्ट कोपरगाव बेट.
माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र विशेष महत्व आहे.प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात,भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.यंदा तो दि.२६ फेब्रुवारी रोजी संपन्न होत आहे.कोपरगाव बेट येथे संत जनार्दन स्वामी मंदिर परिसर व गुरु शुक्राचार्य मंदिर आदी परिसरात हा उत्सव पुजारी व प्रशासनाचे पदाअधिकारी यांच्या उपस्थितीत हा उत्सव पार पडत आहे.त्यानिमित्त शुक्राचार्य मंदिर ट्रस्टने नुकतेच पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.त्यावेळी ही माहिती दिली आहे.

दरम्यान महाशिवरात्रीच्या उत्सवानंतर येणाऱ्या रविवार दि.०२ मार्च रोजी सायंकाळी ०६ वाजता या दिवशी उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे आयोजन केले आहे.त्यासाठी धरमवीर अग्रवाल,लाला दुर्गादास मित्तल,रा.संभाजीनगर यांनी आपला सहभाग नोंदवला आहे.
सदर प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी माहिती देताना सांगितले की,”शुक्राचार्य हे हिंदू पुराणांतील एक महान ऋषी आणि असुरांचे गुरु होते.त्यांना शुक्र उशनस असेही म्हणतात ते भृगू ऋषी यांचे पुत्र होते.शुक्राचार्य हे एक उच्च विद्वान होते,पण त्यांना देवलोकात योग्य स्थान मिळाले नाही.त्यामुळे ते दानव,दैत्य आणि असुरांचे गुरु बनले.शुक्राचार्य हे सूक्तद्रष्टा ऋषी होते.त्यांना संजीवनी मंत्राचे ज्ञान होते.त्यांनी दानव, दैत्य आणि असुरांना देवांविरुद्ध युद्ध करण्यास मदत केली.वैवस्वत मन्वंतरातील पुरंदर इंद्राची कन्या जयंती यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.त्यांच्यापासून देवयानी नावाची कन्या होती.शुक्राचार्यांचे समाधी मंदिर महाराष्ट्रातील कोपरगाव येथे आहे.त्यामुळे या प्राचीन शहरास मोठे महत्व आहे.शिवरात्रीला या ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यावेळीही विविध कार्यक्रम संपन्न होत आहे.या प्रसंगी ‘ शुक्रतिर्थ ‘या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन संपन्न होत आहे.या शिवाय ओंकार आव्हाड यांनी संकलित केलेल्या हिंदीतील ‘श्री शुक्र नित्य सेवा ‘ हे पुस्तक व त्यांनी तयार केलेल्या www.gurushukracharyamandir.com या वेबसाईट चे उद्घाटन संपन्न झाले आहे.
सदर प्रसंगी नाशिक येथील प्रसिद्ध वास्तू तज्ञ शशिकांत वांद्रे,कोपरगाव नगरपरिषद माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील,डॉ.राजेंद्र मुळे,ज्योतिषाचार्य मनीष गोसावी,ओंकार आव्हाड,ऍड.संजीव कुलकर्णी,ऍड.गजानन कोऱ्हाळकर,सुहास कुलकर्णी,हेमंत पटवर्धन,सचिन परदेशी,प्रसाद पऱ्हे,संजय वडांगळे,बाळासाहेब लाकारे,सुजित वरखेडे,विलास आव्हाड,दत्तात्रय सावंत,महेंद्र नाईकवाडे,राजेंद्र आव्हाड,बाळासाहेब गाडे,विजय रोहम,दिलीप सांगळे,विकास शर्मा,भागचंद रुईकर,मधुकर साखरे,आदिनाथ ढाकणे,अरुण जोशी,विशाल राऊत,राजाराम पोवरा आदीसह सर्व विश्वस्त ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर पर्वकाळात महाकुंभाच्या स्नानाची शेवटची पर्वणी लक्षात घेऊन आयोजकांनी मंदिरात होणाऱ्या गर्दीचे नियोजन केले आहे.मंदिराची विद्युत सजावट,मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक पूजा विधी अभिषेक,याची सोय केली असून त्यासाठी आवश्यक साहित्याची मोफत सुविधा केली आहे.