धार्मिक
हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करा-…यांची मागणी
न्युजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
प्रतिकूल परिस्थितीत भारतातील संतांनी मंदिरांची संस्कृती टिकवून ठेवली.सद्यस्थितीत हिंदू केवळ तीर्थक्षेत्राला जातात;परंतु त्या तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य नष्ट होत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करत असून ही बाब गंभीर असून अध्यात्म हिंदूच्या श्वासात आणि रक्ताच्या प्रत्येक थेंबात यायला हवे ते हिंदू धर्माविषयी निष्क्रिय राहिले तर भविष्यात जगणे कठिण होईल असा इशारा सरला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी शिर्डी येथे एका कार्यक्रमात बोलताना नुकताच दिला आहे.
शिर्डी येथे विविध हिंदू संघटनांनी तृतीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद आयोजित केली होती त्यावेळी ते बोलत होते.
दरम्यान या परिषदेस श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे रमेशगिरी महाराज,कोपरगाव येथील श्रीक्षेत्र राघवेश्वर देवस्थानचे मठाधिपती राघवेश्वरानंदगिरी महाराज,सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम,मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष गिरीष शहा,श्री जीवदानी देवी संस्थानचे अध्यक्ष प्रदीप तेंडोलकर आणि मंदिर महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट आदीसह महाराष्ट्र मंदिर महासंघ,विरार येथील श्री जीवदानी देवी संस्था,श्री ज्योतिर्लिंग भीमाशंकर देवस्थान,श्री साई पालखी निवारा आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,’कोट्यवधी रुपयांचे व्यवहार होत असूनही भारतातील एकही मशिद किंवा चर्च सरकारने ताब्यात घेतलेले नाही या सापत्नपणावर त्यांनी नेमके बोटं ठेवले आहे.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,’ सरकार अन्य धर्मियांची प्रार्थनास्थळे सरकारच्या ताब्यात घेताना दिसत नाही; मात्र हिंदूंचीच मंदिर सरकारच्या ताब्यात का घेतली जात आहे ? त्यामुळे आता हिंदूंची मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करावीत त्याचा वापर हिंदूच्या हितासाठी करावा अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.
कार्यक्रमाची सुरुवात श्रीक्षेत्र बेट कोपरगाव येथील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरीजी) महाराज समाधी मंदिराचे रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यानंतर सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ.जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.‘भारतात खर्या अर्थाने रामराज्य आणायचे असेल,तर प्रत्येक मंदिराने राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी आवश्यक अशा मंदिर संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणे अपरिहार्य आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप तेंडोलकर यांनी केले त्यावेळी ते म्हणाले की, ‘‘मंदिरांचे संवर्धन हे भगवंताचे कार्य आहे.त्यामुळे या कार्यासाठी ईश्वरानेच आपणाला एकत्र आणले आहे.महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या माध्यमातून मागील ३ वर्ष झालेली कार्ये निश्चितच उल्लेखनीय आहेत.या परिषदेच्या माध्यमातून सर्व विश्वस्तांना एक व्यासपीठ प्राप्त झाले आहे.’
सदर प्रसंगी मंदिर महासंघाचा कार्यात्मक आढावा महासंघाचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट यांनी मांडताना म्हणाले की,”लोकसभेच्या निवडणुकीत धर्मांधांनी त्यांची रणनिती मशिदींमध्ये ठरवली.मतदान कुणाला करावे,यासाठी फतवे काढले तर मग हिंदु धर्म आणि राष्ट्र या विषयीची रणनीती मंदिरांमध्ये का निश्चित केली जाऊ नये ? या परिषदेला एकवटलेल्या हजारो विश्वस्तांनी रस्त्यावर उतरून मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करण्यासाठी मागणी केली तर सरकारला मंदिरे सरकारीकरणापासून मुक्त करावीच लागतील. अशाप्रकारे प्रत्येक विश्वस्ताने ‘आपल्या मंदिरातून हिंदूसंघटन कसे करता येईल ?’, त्याचा विचार करून कार्य केल्यास भविष्यात हिंदूंना सुरक्षा देण्याचे कार्यही मंदिरांद्वारे करता येऊ शकते.
मंदिरांतूनच संस्कार केले,तरच राष्ट्रप्रेमी पिढी निर्माण होईल-गिरीष शहा
एक महिन्यापूर्वी आपण अबुधाबीला श्री स्वामीनारायण मंदिर पहायला गेलो होतो तेथील व्यवस्था उत्तम होती.रोज १० ते २० हजार यात्रेकरू दर्शन करायला येतात तसेच तिकडे येऊन संस्कार आणि संस्कृती याविषयी ज्ञानवर्धन होत होते.वास्तविक हेच ज्ञान आपल्याकडे पूर्वीपासून आहे.नालंदा आणि तक्षशीला विद्यापिठांतील पुस्तके,आपले वेद,योग,न्यायप्रणाली,गणित,आयुर्वेद हे सर्व आपल्या मंदिर संस्कृतीतून उगम पावले आहेत.भारतीय संस्कृतीत पूर्वीपासून हिंदूंची मंदिरे ही गुरुकुले होती.शिक्षणपद्धती होती. सध्या परिस्थिती काय आहे ? केवळ मंदिर आमचे आहे.त्याच्या आसपास असे काहीच नाही.यातून आपल्याला बाहेर पडावे लागेल.मंदिरामध्ये १६ पैकी १५ संस्कार करण्याची व्यवस्था पाहिजे.गर्भाधान संस्कारसारखे संस्कार मंदिरात झाला तर येणारी पिढी राष्ट्रप्रेमी निर्माण होईल असे आवाहन मुंबई येथील समस्त महाजन संघाचे अध्यक्ष गिरीष शहा यांनी केले आहे.