धार्मिक
सत्कर्माने पाप अन् ज्ञानाने अज्ञान धुवून जाते-मीराबाई

न्युजसेवा
संवत्सर -(प्रतिनिधी)
माणूस दारिद्र्य,पाप आणि अज्ञान यामुळे माणूस नेहमीच दुःखी राहतो.मात्र कष्टाने दारिद्र्,सत्कर्माने पाप आणि ज्ञानाने अज्ञान धुवून टाकले की,माणूस सुखी होतो असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“गोदावरी परिसर भगवान श्री रामाबरोबरच मोठ-मोठ्या ऋषीमुनी यांच्या मंत्रोच्चाराने व पदस्पर्शाने पुणे झालेला आहे.राजा दशरथांना गुरु वशिष्ठांनी पुत्र कामेष्टी यज्ञ पार करू शकतील असे एकमेव ऋषी असून ते विभांडक ऋषींचे पुत्र शृंगऋषी महाराष्ट्रात पंचवटी परिसरात गोदावरी तीरावर संवत्सर या गावी भेटतील जे तुमचा पुत्रकामेष्टी यज्ञ पार करू शकतील अशा गुरू आज्ञेने राजा दशरथ ज्या ठिकाणी आले होते तेच आजचे शृंग ऋषी मंदिर होय”- ह.भ.प.मीराबाई मिरिकर.
संवत्सर येथे ऋषीपंचमीनिमित्त गोदावरीच्या काठावरील श्री शृंगऋषींच्या मंदिराजवळ महिलांनी स्नानांची पर्वणी साधली.यानिमित्त श्री शनी महाराज मंदिराच्या प्रांगणात ह. भ.प.मीराबाई मिरीकर यांचे किर्तन आयोजित करण्यात आले होते.त्यावेळी त्या बोलत होत्या.
सदर प्रसंगी ह.भ.प.संजय महाराज जगताप,आ.आशुतोष काळे,माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांच्यासह अनेक मान्यवरांनी व संत महंतांनी व भाविकांनी याप्रसंगी भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणल्या की,”आपल्या भागाला गंगथडी म्हणून संबोधले जाते आणि म्हणून आपण भाग्यवान आहोत की,आपला परिसर भगवान श्री रामाबरोबरच मोठ-मोठ्या ऋषीमुनी यांच्या मंत्रोच्चाराने व पदस्पर्शाने पुणे झालेला आहे.राजा दशरथांना गुरु वशिष्ठांनी पुत्र कामेष्टी यज्ञ पार करू शकतील असे एकमेव ऋषी असून ते विभांडक ऋषींचे पुत्र शृंगऋषी महाराष्ट्रात पंचवटी परिसरात गोदावरी तीरावर संवत्सर या गावी भेटतील जे तुमचा पुत्रकामेष्टी यज्ञ पार करू शकतील अशा गुरू आज्ञेने राजा दशरथ ज्या ठिकाणी आले होते तेच आजचे शृंग ऋषी मंदिर होय.अशा या शृंग ऋषींच्या पुत्र कामेष्टी यज्ञानंतर भगवान श्रीराम,लक्ष्मण बरोबरच रुद्रावतार बजरंग बली हनुमान यांनी या सृष्टीत अवतार कार्य धारण केले.विश्वातले सर्व ज्ञान हे माणसासाठी आहे.परंतु या ज्ञानापासून माणूस वंचित आहे.चांगली जीवनमूल्ये,चांगली गुणधर्मे,चांगले विचार यापासून माणूस दूर जाताना दिसतो.त्यामुळे मानवी जीवन हे दैवी जीवन बनण्याऐवजी आसुरी जीवन बनत चालले आहे.ही परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी चांगल्या माणसांच्या सहवासात आले पाहिजे.उत्तम जीवन जगणारी माणसे सद्विचारी असतात तर जीवनमूल्ये हरवून बसणारी माणसे मात्र जगण्याची व्यर्थ धडपड करीत असतात.सामाजिक,राजकीय,शैक्षणिक,कृषी,उद्योग अशा विविध क्षेत्रात माणूस मोठा होतो पण त्या मोठेपणाला समाजमान्यता असेलच असे नाही.सत्कर्मातून मिळालेले मोठेपण आनंददायी असते असे सांगून मीराबाई यांनी सद्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालला असून अहंभाव मात्र फोफावत चालला असल्याची खंत व्यक्त केली.प्रत्येकाने मनातला अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कवाडे उघडी ठेवायला हवीत.संस्काराची शिदोरी,विचारचे धन जोडता आले तर जीवन धन्य होईल असे राम नामाचा महिमा सांगून राम हे शब्द नसून ते एक शस्त्र असल्याचे त्यांनी सांगितले तसेच कोणीतरी म्हटल्याप्रमाणे खरोखरच होता,भारत देश हा महान होता मात्र आपल्या काही नविचारी बुद्धींच्या जीवाकडून तो गहाण ठेवल्यासारखा होतोय हे सांगताना आपल्याकडे असलेला कोहिनूर हिरा हा आपण ब्रिटनच्या तत्कालीन राणीला भेट दिला असल्याचे सांगितले.या प्रसंगी मीराबाई मिरीकर यांनी ऋषीपंचमीचे महत्व व या दिवशी महिलांनी आचरण करावयाचे व्रत याबाबत महिलांना शेवटी मार्गदर्शक केले आहे.
सदर प्रसंगी ऋषीपंचमीनिमित्त गोदावरी नदीत स्नानाची पर्वणी साध्य करण्यासाठी महिलांनी प्रचंड गर्दी केलेली होती.समाधानकारक पावसामुळे यंदा नदीला दुथडी भरुन पाणी वाहत असल्यामुळे संपूर्ण गोदाकाठ भक्तीमय झालेला होता.संवत्सरला श्री क्षेत्र पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते.त्यातच मीराबाई मिरीकर यांच्या सुश्राव्य किर्तन श्रवणाचा लाभ मिळत असल्याने औरंगाबाद,नाशिक,अ.नगर अशा विविध ठिकाणावरुन महिलांसह भावीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांनी किर्तन श्रवणासह महाप्रसादाचा लाभ घेतला.या कार्यक्रमासाठी आ.आशुतोष काळे यांनी पंगत वाढीस मदत केली तसेच संजय महाराज हे आवर्जून उपस्थित होते.