जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या ठिकाणी दिंडी सोहळा उत्साहात संपन्न !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

श्री क्षेत्र भऊर येथून आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला श्रीक्षेत्र पंढरपूर व कामिका एकादशीला श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या पायीदिंडी सोहळ्याची सांगता नुकतीच श्रीक्षेत्र भऊर येथे ह.भ.प.संजयजी महाराज जगताप यांच्या प्रवचन व नंतर महाप्रसादाने मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

  

“दिंडी काला हा सामुदायिक दिंडी सांगताकाला,हा संतांचा काला आहे.सामूहिक उपासनेचा काला आहे असे सांगत कलियुगात भक्ती,ध्यान,चिंतन,वाचन,मनन या गोष्टी महत्त्वाच्या आहेत”- संजयजी महाराज जगताप.

  श्रीक्षेत्र भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान पायी दिंडी सोहळाचे मार्गदर्शक प्रसिद्ध कीर्तनकार संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र पंढरपूर,आळंदी, त्रिंबकेश्वर,पैठण,पुणतांबा असे दरवर्षी आयोजन करण्यात येते.नुकताच श्रीक्षेत्र पुणतांबा या ठिकाणी श्री रोकडेश्वर हनुमान पायी दिंडी सोहळाचे आषाढ महिन्यात आयोजन करण्यात आले होते.त्यामध्येही मोठ्या संख्येने भाविक सामील झाले होते.या सोहळ्याची सांगता गुरुवार एक ऑगस्ट 2024 रोजी श्रीक्षेत्र भऊर येथे श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात विना पूजन संजयजी महाराज जगताप यांच्या प्रवचनाने मोठ्या उत्साहात करण्यात आली.प्रवचनानंतर भाकरी आमटीच्या महाप्रसादचा लाभ भाविकांनी घेतला. महाप्रसादाचे अन्नदाते कचरू चांगदेव जगताप हे होते.


   यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार जगताप महाराज (भऊरकर) यांचे मोठ्या भक्तीमय वातावरणात प्रवचन संपन्न झाले.यावेळी आपल्या प्रवचनात उपस्थितांना मार्गदर्शन करताना हभप संजयजी महाराज जगताप म्हणाले की ,आषाढी देवशयनी एकादशी झाल्यानंतर श्रीक्षेत्र पंढरपूरला आषाढीपौर्णिमेला पायी दिंडी सोहळ्यांचा काला होतो,तो देव देवतांचा काला असतो.तर आषाढी कामिका एकादशी नंतर आषाढ अमावस्येला होणारा पायी दिंडी सोहळ्याचा काला हा संतांचा काला असतो.असे सांगत श्री क्षेत्र पंढरपूरला राज्यातून,परराज्यातून अनेक दिंड्या,लाखो वारकरी आषाढी देवशयनी एकादशीला येत असतात.तेथे आषाढ पौर्णिमेला दिंड्यांचा पौर्णिमेला काला होतो.तो देवतांचा काला असतो.त्यानंतर पंधरा दिवसांनी आषाढी कामिका एकादशीला राज्यातील श्रीक्षेत्र पुणतांबे सह विविध संत महात्मे यांच्या तीर्थस्थानांच्या ठिकाणी यात्रा भरतात.अनेक पायी दिंड्या तेथे जातात.त्यानंतर दुसऱ्या दिवशी द्वादशीला या पायी दिंड्यांचा सांगता सोहळा होतो,काला होतो, हा काला संतांचा काला समजला जातो. असे सांगत श्री क्षेत्र पंढरपूर त्याचबरोबर राज्यातील इतरही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी लाखोच्या संख्येने वारकरी येत असतात. परंतु ईश्वर कृपेने सर्व दर्शन करून सुखरूप परत घरी येत असतात. त्यामुळे हा पायी दिंडयांचा सांगता सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होत असतो.श्रीक्षेत्र भऊर येथून श्रीक्षेत्र पंढरपूर व श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पायी दिंडी सोहळा नुकताच आषाढ महिन्यात आयोजित करण्यात आला होता. त्याचा सांगता सोहळा आज गुरुवारी काल्याने झाला आहे. हा सामुदायिक दिंडी सांगताकाला,हा संतांचा काला आहे.सामूहिक उपासनेचा काला आहे असे सांगत कलियुगात भक्ती,ध्यान,चिंतन,वाचन,मनन या गोष्टी महत्त्वाच्या असल्याचे शेवटी सांगितले आहे.

   सदर प्रसंगी त्याठिकाणी प्रवचनानंतर भाकरी आमटीच्या महाप्रसादाचा मोठ्या संख्येने भाविकांनी लाभ घेतला.या कार्यक्रमाला श्रीक्षेत्र भऊर व पंचक्रोशीतील वारकरी पायी दिंडीचे सर्व सह मार्गदर्शक,सहचालक,अन्नदाते,टाळकरी,विनाकरी,सर्वच भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी पणे पार पाडणे कामी श्रीक्षेत्र भऊर येथील ग्रामस्थ,भजनी मंडळ,यांनीही मोठे परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close