जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

श्री क्षेत्र पुणतांब्यासाठी दिंडीचे होणार प्रस्थान…

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
श्री क्षेत्र भऊर येथून दरवर्षीप्रमाणे संत योगीराज गंगागिरीजी महाराज,संत सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने यावर्षीही प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प.संजयजी महाराज जगताप  भऊरकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र पुणतांबा येथे कामिका एकादशी निमित्ताने पायी दिंडी सोहळ्याचे  बुधवार 31 जुलै 2024 रोजी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

संत चांगदेवांना आपल्याकडील असलेल्या शक्तीचा गर्व होता.ते वाघावर आरूढ होऊन व हातात सर्प चाबुक धरून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले.संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करण्याचे ठरवले.ते आपल्या भावंडासह भिंतीवर बसून चांगदेवांच्या दिशेने मार्गस्थ झाले.त्यांनी त्यांचे गर्वहरण केले.या ठिकाणी ते मृत व्यक्तींना जिंवत करत अशीही आख्यायिका आहे.



    १४०० वर्ष जगलेल्या चांगदेव यांचे मंदिर हे येथील मुख्य मंदिर आहे.दर शंभर वर्षांनी संत चांगदेव वेगवेगळ्या ठिकाणी तपश्चर्या करीत आणि पुणतांबा हे चौदावे ठिकाण आहे जेथे त्यांनी समाधी घेतली,असे म्हणले जाते. एक आख्यायिका अशी आहे की,संत चांगदेवांना आपल्याकडील असलेल्या शक्तीचा गर्व होता.ते वाघावर आरूढ होऊन व हातात सर्प चाबुक धरून संत ज्ञानेश्वरांच्या भेटीला गेले.संत ज्ञानेश्वरांनी चांगदेवांचे गर्वहरण करण्याचे ठरवले.ते आपल्या भावंडासह भिंतीवर बसून चांगदेवांच्या दिशेने मार्गस्थ झाले.त्यांनी त्यांचे गर्वहरण केले.या ठिकाणी ते मृत व्यक्तींना जिंवत करत अशीही आख्यायिका आहे.या ठिकाणी राज्यभरातून दींड्या येत असतात तशीच ती क्षेत्र भऊर येथून संजयजी महाराज जगताप यांचे मार्गदर्शनात येत असते.


 
   दरवर्षी श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पुणतांबा अशी पायी दिंडी भऊर तालुका वैजापूर ग्रामस्थांच्या वतीने आयोजित करण्यात येते.श्रीक्षेत्र भऊर येथील श्री रोकडेश्वर हनुमान मंदिरात श्री विठ्ठल रुक्मिणीमाता व श्री संत चांगदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून बुधवार 31 जुलै 2024 रोजी सकाळी या श्री रोकडेश्वर हनुमान पायी दिंडीचे प्रस्थान होणार असून भगव्या पताका,भगव्या झेंडे,टाळ,मृदंग,भजन व पांडुरंगाचे नामस्मरण करत श्रीक्षेत्र पुणतांबा येथे पोहोचल्यानंतर येथे गोदा स्नान,श्री विठ्ठल रुक्मिणी माता दर्शन व श्री संत चांगदेव महाराज समाधी दर्शन व परिसरातील देवस्थानचे दर्शन होणार आहे.

   श्री क्षेत्र भऊर येथून संजयजी महाराज जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायी दिंडी सोहळा मोठा उत्साहात संपन्न झाला.त्र्यंबकेश्वर,पैठण,पंढरपूर,पुणतांबा,आळंदी आदी ठिकाणी श्रीक्षेत्र भऊर येथून पायी दिंडी सोहळ्याचे ह.भ.प.संजयजी महाराज जगताप यांच्या नेतृत्वाखाली आयोजन केले जाते.या दिंडी सोहळ्यासाठी समस्त भऊर ग्रामस्थ तसेच एडवोकेट प्रमोद दादा जगताप यांचे मोठे सहकार्य लाभते.त्याचप्रमाणे भजनी मंडळी,सह दिंडी चालक व वारकरी यांचेही मोलाचे सहकार्य या पायी दिंडी सोहळ्यासाठी लाभते.
31 जुलै 2024 रोजी श्रीक्षेत्र भऊर ते श्रीक्षेत्र पुणतांबा दिंडी सोहळ्यात सर्व भऊर ग्रामस्थ,पंचक्रोशीतील ग्रामस्थ,वारकरी भजनीमंडळ यांनी जास्तीत जास्त ह.भ.प.संजयजी महाराज जगताप यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close