जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

आषाढी एकादशी दिंड्याना…या खासदारांनी दिल्या भेटी…!

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होणाऱ्या दींड्याना शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेटी देऊन त्यांच्या अडचणी व प्रकृतीबाबत विचारणा केली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्याबाबत अनेकांनी समाधान व्यक्त केले आहे.

श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत गंगागागिरी महाराज यांचे आश्रमात महंत रामगिरिजी महाराज यांची खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेसह कार्यकर्त्यांनी भेट घेतली आहे.

 

“श्री क्षेत्र सराला बेटास जोडणारे रस्ते व पुणतांब्यानाजिक पुरणगाव नदीवर जोडणाऱ्या व अंतर कमी करणाऱ्या पुलाची गरज आहे.त्यामुळे शिर्डी-गोदाधाम (सराला बेट )यांना जोडणाऱ्या रस्त्याचे अंतर कमी होऊन या तीर्थ क्षेत्रास भाविकांना हवाई अंतर कमी होणार आहे”-महंत रामगिरिजी महाराज,सराला बेट.

  टाळमृदंगाच्या गजरात व विठ्ठलाच्या नामघोषात वारकऱ्यांच्या दिंड्या एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात दाखल होतात.झेंडे,तुताऱ्या.सजवलेला स्वारीचा घोडा,अब्दागीर,पालख्या,इतर घोडे,बैलगाड्या यांचे ताफे व डोक्यावर तुळशीवृंदावन किंवा सामानाची गाठोडी घेतलेल्या मराठमोळ्या स्त्रिया या सर्वांच्या गर्दीने पंढरपुरात उत्सवी वातावरण निर्माण होते.संत भानुदास महाराजांनी विजयनगरहून श्रीविठ्ठलाची मूर्ती पंढरपुरात आणली तो दिवस कार्तिकी एकादशीचा होता.या दिवसाची आठवण म्हणून सर्वप्रथम रथ प्रदक्षिणा काढण्यात आली.याच दिवसाचे स्मरण म्हणुन कार्तिकीस एकादशीस रथ काढण्यात येतो.इ.स.१८१० मध्ये सांगलीच्या पटवर्धनांच्या प्रोत्साहनाने रथयात्रा व राजपूजा होऊ लागली.आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशीला दुपारी खाजगीवाले वाड्याजवळ ग्रामप्रदक्षिणेला सुरुवात होते.समोर हत्ती व घोडे असलेला हा रथ भाविक ओढतात.आंत विठ्ठल,राही व रुक्मिणीच्या मूर्ती असतात.त्यासाठी राज्यभरातून मोठया संख्येने भाविक भक्त उपस्थित होतात.या वर्षीही आषाढीला विक्रमी गर्दी झाली होती.त्यासाठी नगर जिल्ह्यातून मोठया संख्येने दिंड्या विक्रमी व मोठ्या संख्येने दाखल झाल्या होत्या.त्या दिंड्यांना शिर्डीचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी भेटी दिल्या आहेत.

श्री क्षेत्र पंढरपूर येथे श्री पांडुरंगाचे दर्शन घेतल्यानंतर खा.भाऊसाहेब वाकचौरे व अन्य मान्यवर अन्य दिसत आहे.

“आम्हाला कशाची कमी नाही मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या श्री साईबाबांची दिंडी आम्ही वीस वर्षापूर्वी सुरू केली तेंव्हा कोणीही हा विचार केला नाही मात्र आज आमची दिंडी नावारूपास आली असता अनेकांनी तो कित्ता गिरवत त्याचे गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली आहे;”आम्ही संन्यासी माणसे;आम्हाला कशाची गरज नाही मात्र साक्षात पंढरीचा अवतार (साई रमावर ) असलेल्या श्री साईबाबा यांच्या दिंडीस आजही समाज व साईबाबा संस्थांनची मान्यता घ्यावी लागत असल्याचे दुःख आहे-महामंडलेश्वर काशिकांनद महाराज,शिर्डी आश्रम.


 

श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील महंत भास्करगिरिजी महराज यांच्या दिंडीस  भेट दिली तो क्षण.

दरम्यान या दिंड्यांत श्री क्षेत्र सराला बेट येथील संत गंगागिरिजी महाराज यांची महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखालील दिंडी,श्री क्षेत्र देवगड संस्थान येथील महंत भास्करगिरिजी महराज यांची दिंडी ता.नेवासा,अकोले येथील अगस्ती ट्रस्टचे अध्यक्ष ऍड.के.डी.धुमाळ व ह.भ.प.दिपक महाराज देशमुख यांची अगस्ती देवस्थान ट्रस्ट आश्रम,दिंडी,लहित खुर्द येथील श्री संगमेश्वर पायी दिंडी सोहळा,गणोरे येथील अंबिका माता-राजोबा पायी दिंडी,भटुंबरे येथील श्री त्रिंबकराज स्वामी वारकरी सेवाश्रम,देवळाली प्रवरा येथील ढुस महाराज,रामेश्वर पंचक्रोशी पायी दिंडी सोहळा,धांदरफळ,रुई तु.राहाता येथील साई जनार्दन पायी दिंडी सोहळा,ह.भ.गागरे महाराज यांची दिंडी,महामंडलेश्वर काशिकानंद महाराज यांची श्री साईबाबा पालखी सोहळा,शिर्डी आदींचा समावेश आहे.


   सदर दिड्यांना भेटी दिल्यावर गणोरे येथील दिंडी चालकांनी पंढरपुरात या वर्षी स्वच्छता गृहांची मोठी आबाळ झाल्याची तक्रार पालखीतील सेवेकऱ्यानी केली आहे.तर लहीत येथील दिंडी चालकांनी नगर पंढरपूर मार्गावर शिर्डी-नाशिक मार्गावर पालखी मार्ग बनवला तसा मार्ग पंढरपूर मार्गावर बनवावा अशी मागणी त्यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांचेकडे केली आहे व स्थानिक विकास निधीतून फिरत्या (मोबाईल) स्वच्छता गृहांची मागणी केली आहे.
 
   सदर प्रसंगी महंत रामगिरिजी महाराज यांनी,”श्री क्षेत्र सराला बेटास जोडणारे रस्ते व पुणतांब्यानाजिक पुरणगाव नदीवर जोडणाऱ्या पुलाची मागणी केली आहे.त्यामुळे शिर्डी-गोदाधाम (सराला बेट )यांना जोडणाऱ्या रत्याचे अंतर कमी होऊन या तीर्थ क्षेत्रास भाविकांना हवाई अंतर कमी होणार आहे.या शिवाय शिर्डी पंढरपूर या मार्गावर पूर्वीप्रमाणे पुन्हा एकदा रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी भाविकांनी केली आहे.

   त्यास खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी सकारात्मक मार्गाने विचार केला जाईल व हे प्रश्न सोडवताना सोलापूर जिल्हाधिकारी,पंढरपूर नगरपरिषद मुख्याधिकारी,स्थानिक आमदार आदींना आगामी दोन महिन्यात लेखी व समक्ष भेटून या प्रश्नावर चर्चा केली जाऊन मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.

खा.वाकचौरे यांनी श्री त्रिंबकराज स्वामी वारकरी सेवाश्रम,देवळाली प्रवरा येथील ढुस महाराज यांच्या दिंडी भेट दिली तो क्षण.

  

दरम्यान या ठिकाणी क्षेत्र शिर्डी येथील दिंडिस श्री साईबाबा संस्थानने अद्याप मान्यता  दिली नाही अशी खंत महंत काशिकांनंद महाराज यांनी व्यक्त केली आहे.”आम्हाला कशाची कमी नाही मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेले साईबाबा यांची दिंडी आम्ही वीस वर्षापूर्वी सुरू केली तेंव्हा कोणीही हा विचार केला नाही मात्र आज आमची दिंडी नावारूपास आली असता अनेकांनी तो कित्ता गिरवत त्याचे गैरफायदा उचलण्यास सुरुवात केली असल्याची खंत व्यक्त केली आहे व “आम्ही संन्यासी माणसे आम्हाला कशाची गरज नाही मात्र साक्षात पंढरीचा अवतार (साई रमावर ) असलेले श्री साईबाबा यांना आजही समाज व साईबाबा संस्थांनची मान्यता घ्यावी लागत असल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे.काही नाव साधर्म्य असलेल्या संस्थांकडून चुकीच्या गोष्टी घडत असून त्या थांबवण्याची गरज आहे.आम्हाला काहीही अपेक्षा नाही मात्र सर्वधर्म समभावाचे प्रतीक असलेले साईबाबांची दिंडी ही अधिकृत करावी” अशी मागणी त्यांनी खा.वाकचौरे यांचेकडे केली असून त्या दिशेने प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे.खा.वाकचौरे यांच्याच काळात आपण ही दिंडी सुरू केली होती याची आठवणही त्यांनी काढली असून आगामी काळात त्यांची मान्यता ही आपल्याच नशिबात लिहिली असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी खा.भाऊसाहेब वाकचौरे यांना सांगितले आहे.आपण नकीच या प्रश्नी न्याय देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन खा.वाकचौरे यांनी शेवटी दिले आहे.

   दरम्यान खा.वाकचौरे यांनी आधी आषाढी निमित पांडुरंगाचे भल्या पहाटे दर्शन घेतले होते त्यानंतर त्यांनी या दिंड्याना भेटी दिल्या आहेत.त्यांचे समवेत निळवंडे कालवा कृती समितीचे संस्थापक व पत्रकार नानासाहेब जवरे,संगमनेर पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते,महेंद्र गोडगे,रामनाथ बोऱ्हाडे,दत्तात्रय घोलप आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close