जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

…या शहरात प्रथमच श्री जगन्नाथ रथयात्रा

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   संपूर्ण देशात धार्मिक सणाप्रमाणे काढण्यात येणारी श्री भगवान जगन्नाथ यात्रा प्रथमच कोपरगावमध्ये काढण्यात आली होती.या रथ यात्रेत आ. आशुतोष काळे यांनी सहभागी होवून श्री भगवान जगन्नाथाचे पूजन करून आशिर्वाद घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

कोपरगावमध्ये काढण्यात आलेल्या श्री.भगवान जगन्नाथाच्या रथ यात्रेत आ.आशुतोष काळे यांनी सहभागी होत पूजन करून आशिर्वाद घेतले.

  

हिंदू पंचांगानुसार,दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ओडिशामध्ये भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढली जाते.या यात्रेत देश-विदेशातून लाखो भाविक सहभागी होतात.कोपरगाव शहरात पहिल्यांदा अशी रथयात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे.

   हिंदू पंचांगानुसार,दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी ओडिशामध्ये भगवान जगन्नाथाची भव्य रथयात्रा काढली जाते.या यात्रेत देश-विदेशातून लाखो भाविक सहभागी होतात.भगवान जगन्नाथासोबतच त्यांचा भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांचाही रथ यात्रेत सहभागी होतो.भारतातील उल्लेखनीय रथयात्रांमध्ये पुरीची रथयात्रा,धामराई रथयात्रा आणि महेशची रथयात्रा यांचा समावेश होतो.भारताबाहेरील गुप्तीपारा आणि संतीपूर हिंदू समुदायातील रथयात्रा,जसे की सिंगापूरमध्ये,जगन्नाथ,कृष्ण,शिव आणि मरियमम्न यांच्याशी संबंधित असलेल्या रथयात्रा साजरी करतात.कोपरगाव शहरात पहिल्यांदा अशी रथ यात्रा संपन्न झाली आहे.

इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील भक्तीवेदांत स्वामी प्रभुपाद यांनी भगवान जगन्नाथाची कृपा जगभर पसरवण्यासाठी रथयात्रा सुरू केली आहे.त्या पार्श्वभूमीवर कोपरगाव शहरात प्रथमच आंतरराष्ट्रीय कृष्णा भावनामृत संघ इस्कॉन कोपरगाव यांच्यावतीने श्रीमान सुंदर चैतन्य प्रभुजी व श्री लक्ष्मीनारायण दास यांच्या मार्गदर्शनाखाली भगवान जगन्नाथ रथयात्रेचे आयोजन करण्यात येवून हजारो भक्तांच्या उपस्थितीत श्री.भगवान जगन्नाथाची भव्य रथ यात्रा काढण्यात आली होती.त्यावेळी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रविवार (दि.०७) रोजी भगवान श्री जगन्नाथाची महाआरती करून हि रथ यात्रा तहसील कार्यालय,भाजी मार्केट मैदान,गुरुद्वारा रोड, विघ्नेश्वर चौक,छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते साहित्यरत्न लोकशाहीर आण्णा भाऊ साठे स्मारक या मार्गाने काढण्यात आली. भगवान जगन्नाथ,भगवान बलदेव आणि माता सुभद्रादेवी यांच्या मूर्ती विराजमान असलेल्या रथाला फुलांसह रंगीबेरंगी वस्त्रांनी केलेली सजावट पाहून भाविकांना जगन्नाथ पुरीच्या मुख्य रथ यात्रेच्या सोहळ्यात उपस्थित असल्याची अनुभूती येत होती.यावेळी आ.काळे यांनी देखील या रथ यात्रेत सहभागी होवून भगवान जगन्नाथाचा रथ ओढला.श्री भगवान जगन्नाथाचे पूजन करून आशिर्वाद घेतले व आपली कृपा दृष्टी मतदार संघातील जनतेवर कायम रहावी अशी भगवान श्री जगन्नाथाच्या चरणी प्रार्थना केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close