धार्मिक
श्रीलंकेहून अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुका आज…या शहरात
न्यूजसेवा
कोपरगाव-(नानासाहेब जवरे)
सकल हिंदू समाजाची कोपरगावात एक बैठक नुकतीच संपन्न झाली असून दि.२७ डिसेंबर बुधवारी सकाळी ०९ वाजता सुदर्शन वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांच्या पुढाकारातून श्रीलंकेहुन अयोध्येला निघालेल्या प्रभू श्रीरामांच्या पादुकांचे कोपरगांव शहरात स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती कोपरगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिली आहे.
अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होत आहे.यानिमित्त विश्व हिंदू परिषदेच्या वतीने येत्या १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘निमंत्रण संपर्क अभियान’ राबविण्यात येणार आहे.तर सुदर्शन वाहिनीचे संपादक संचालक सुरेश चव्हाणके यांच्या वतीने श्रीलंकेहून थेट प्रभू रामचंद्रांच्या पवित्र पादुका आणण्याचे काम केले आहे.त्या येवला तालुक्यातून कोपरगावात येवला नाका येथे प्रथम येणार आहे.तेथून त्यांचे विघ्नेश्वर मंदिर येथे आगमन होणार आहे.
विघ्नेश्वर मंदिर येथून पादुका पालखीने शहरातील मुख्यरस्त्याने मिरवणुकीद्वारे गांधीनगर येथील रामभक्त हनुमान मंदिरात पोहचतील तेथे धार्मिक विधी पार पडल्यानंतर मिरवाणुकीद्वारेच या पादुका शहरातील सावरकर चौक येथे पोहचतील.
दरम्यान कोपरगाव येथील सावरकर चौक येथे जे रामभक्त कारसेवेसाठी गेले होते त्यांचा सत्कार होईल व तदनंतर हिंदु धर्म योद्धा सुरेश चव्हाणके यांचे प्रबोधन होऊन सदरिल पादुका यात्रेचे अयोध्याकड़े प्रस्थान करणार आहे.या पादुका दर्शन सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शेवटी माजी अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केले आहे.