धार्मिक
…या तीर्थक्षेत्री परदेशी भक्तांची हजेरी !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
शिर्डीतील श्री साईबाबांच्या किर्तीचा महिमा दिवसांगणिक वाढत चालला असून त्यांनी साता समुद्रापार आपली कीर्ती पोचवली आहे.त्याची अनुभूती नुकतीच आली असून युरोपातील जर्मनी,स्वित्झर्लंड,ऑस्ट्रीया,रशीया,चेक व डेन्मार्क या देशांतील ३७ महिला व १५ पुरुष असे एकुण ५२ परदेशी साईभक्तांनी श्री साईबाबांच्या माध्यान्ह आरतीस उपस्थित राहून श्रींचे समाधीचे दर्शन घेतले आहे.

श्री साईबाबा एक भारतीय अवलिया फकीर होते.अ.नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते.येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला.तो शंभर वर्षानंतर आता जगभर पसरला आहे.त्याचा अनुभव वेळोवेळी येत आहे.
साईबाबा एक भारतीय अवलिया फकीर होते.अ.नगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील शिर्डी ह्या गांवात त्यांचे वास्तव्य असल्यामुळे त्यांना ‘शिर्डीचे साईबाबा’ म्हणूनही ओळखले जाते.येथूनच बाबांनी सर्वांना श्रद्धा व सबुरी हा महामंत्र दिला.तो शंभर वर्षानंतर आता जगभर पसरला आहे.त्याचा अनुभव वेळोवेळी येत आहे.वर्तमानात युरोपातील साईभक्तांनी त्यांची अनुभूती दिली आहे.

सदर प्रसंगी साई मंदिरातील आरती नंतर श्री साईबाबा संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले आहे.

सदर प्रसंगी प्रशासकीय अधिकारी राजतिलक बागवे,मंदिर प्रमुख रमेश चौधरी व जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके उपस्थित होते.तसेच यानंतर सर्व परदेशी साईभक्तांनी श्री साई प्रसादालयात भेट देऊन प्रसाद भोजनाचा लाभ घेतला यावेळी श्रीसाई प्रसादालय प्रमुख विष्णू थोरात उपस्थित होते.