धार्मिक
…हे माजी मुख्यमंत्री साई दरबारी दाखल

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी आज शिर्डीत येऊन श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन पाद्यपुजा केली आहे.

सदर प्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे,सेनेचे खासदार संजय राऊत,विनायक राऊत, सेनेचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे,मिलींद नार्वेकर व संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यावेळी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन व पाद्यपुजा केल्यानंतर त्यांचा सत्कार साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.शिवा शंकर यांनी केला आहे.