जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे महत्वाचे-ह.भ.प.संजय महाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   

अध्यात्म म्हणजे मुळात कोणतीही धार्मिक गोष्ट नाही,वरिष्ठांच्या प्रती आदरभाव असणे,कनिष्ठांच्या प्रती करुणाभाव बाळगणे,आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये असं वागणं,वेद वाचण्यापेक्षा वेदना वाचता येणे असे असल्याचे प्रतिपादन श्री क्षेत्र भऊर येथील ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी नुकतेच राहाता तालुक्यातील सावळीविहिर बु.येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले आहे.

आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे,ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे,आपण या समाजाचं काही देणं लागतो,आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे,गरजवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे”-ह.भ.प.संजय महाराज जगताप,श्री क्षेत्र भऊर,ता.वैजापूर.

राहाता तालुक्यातील सावळीविहिर बुद्रुक येथील हनुमान मंदिरात श्रावण शु.१५ गुरुवार दि.३१ ऑगष्ट ते श्रावण वद्य ०८ सोमवार दि.०७ सप्टेंबर रोजी साई चरित्र पारायण सोहळा व अखंड हरींनाम सप्ताहाचे आयोजन केले असून त्या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहे त्यात रात्रीच्या सुमारास विविध मान्यवरांची कीर्तन सेवा नुकतीच संपन्न होत असून त्यावेळी पाचवे किर्तन पुष्प गुंफताना वैजापूर तालुक्यातील श्री क्षेत्र भऊर येथील संजय महाराज ते भविकांपुढे ते बोलत होते.

त्यावेळी पुढे बोलताना म्हणाले की,”अध्यात्म म्हणजे आपलं काम प्रामाणिकपणे करणं आहे.आपलं कौटुंबीक आणि सामाजिक कर्तव्य पार पाडणं आहे.मुक्या प्राण्यांवर,पशु-पक्ष्यांवर प्रेम करणे,निरपेक्ष सत्कर्म करत रहाणे,नि:स्वार्थी सेवाभाव जोपासणे,सदैव कृतार्थ भाव अंगी बाळगणे,विना अपेक्षा कौतुक करणे,आपण प्रत्येकाशी सद्भाव आणि सद्भावाने रहाणे,ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत सदैव असणे,आपण या समाजाचं काही देणं लागतो,आणि ते आपण दिलेच पाहिजे अशी मानसिकता मनाशी सतत बाळगणे,गरजवंतांना यथा शक्ती आर्थिक किंवा शाब्दिक मदत करणे,आपल्या बरोबर इतरांची देखील प्रगती होवो हा भाव अंगी असणे,अध्यात्म म्हणजे साधं..सोपं..सरळ..आणि निर्मळ..असणं..दिसणं..आणि वागणं…आहे.

   पुढे बोलतांना ते म्हणाले की,अध्यात्म म्हणजे फक्त पूजा-पाठ,प्रार्थना आणि भक्ती नव्हे तर..पूजा-पाठ,प्रार्थना आणि भक्ती या प्रमाणेच आपली प्रत्येक कृती असणे…आहे.अध्यात्म म्हणजे राष्ट्रपुरुष आणि  राष्ट्रीय संताचं सदैव स्मरण असणे.थोडक्यात अध्यात्म म्हणजे सकाळ पासून रात्री झोपे पर्यंत नित्य कर्म,कर्तव्य पारदर्शक पद्धतीने पार पाडणे असल्याचेही ह.भ.प.संजय महाराज जगताप यांनी शेवटी म्हटले आहे.त्यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपास्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close