जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

पंकजा मुंडे यांनी घेतले…या मंदिराचे दर्शन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)   

ऐतिहासिक पार्श्वभूमी असललेल्या कोपरगाव बेट येथील प्राचीन गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे या आल्या होत्या त्यांनी कोपरगाव बेट येथील गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात मध्यान आरती करून दर्शन घेतले असल्याची माहिती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी आमचा प्रतिनिधीस दिली आहे.

गुरु शुक्राचार्य यांच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पंकजा मुंडे यांनी कोपरगाव येथील प्राचीन शुक्राचार्य मंदिरआणि परिसराची माहिती घेतली व मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांना मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी “शुक्र तीर्थ ” हे पुस्तक भेट दिले आहे.

आरती झाल्यानंतर पंकजाताई  मुंडे यांचे हस्ते गुरू शुक्राचार्य महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला आहे.त्या नंतर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांचे हस्ते पंकजा मुंडे यांचा माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनीं सत्कार केला आहे.
त्या वेळी पंकजा मुंडे यांनी कोपरगाव येथील प्राचीन शुक्राचार्य मंदिरआणि परिसराची माहिती घेतली व मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी त्यांना “शुक्र तीर्थ ” हे पुस्तक भेट देण्यात आले आहे.


  सदर  प्रसंगी कोपरगाव येथील शुक्राचार्य मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड,मंदीर प्रमुख सचिन परदेशी,उपमंदिर प्रमुख प्रसाद पऱ्हे,ट्रस्टी हेमंत पटवर्धन व कमिटी मेंबर मधुकर साखरे,दिलीप सांगळे,विजय रोहोम, संजय वडांगळे,विलास द.आव्हाड,विलास र.आव्हाड,बाळासाहेब लकारे,विकास शर्मा,राजेंद्र आव्हाड,भागचंद रुईकर,सुभाष ढाकणे,विशाल राऊत,महेंद्र नाईकवाडे,डॉ.गर्जे अजेय व बेट ग्रामस्थ,मंदिर पुजारी आदी अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

शुक्राचार्य मंदिरात पंकजा मुंडे यांचे स्वागत करताना ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड व त्यांचे सहकारी दिसत आहे.


     सदर प्रसंगी पंकजा मुंडे यांनी त्यांच्या “शिवशक्ती “परिक्रमा या अंतर्गत गुरू शुक्राचार्य महाराज यांचा आशीर्वाद घेण्यासाठी मंदिरात पवित्र तिसऱ्या श्रावणी सोमवारी मंदिरात दर्शनासाठी येत गुरू शुक्राचार्य महाराजांचा आशीर्वाद घेतला असल्याची माहिती दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close