जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

कोपरगावातून थेट पंढरपूरच्या पांडुरंग चरणी सायकल दिंडी !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

महाराष्ट्राला आषाढी दिंड्या नव्या नाही.मुखी विठ्ठल नाम घेत भजन कीर्तन करत दर वर्षी लाखो भाविक त्या साठी पायी रवाना होत असतात.मात्र कोपरगावातून पर्यावरण पूरक सायकल दिंडी आयोजित करण्याचे काम काही तरुणांनी सुरु केले असून या नविण्यापूर्ण व पर्यावरण पूरक उपक्रमाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

‘वारी’ म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय.वारी ही महाराष्ट्रातील एक मोठी धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे.ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळा होत असली तरी कोपरगावातून आम्ही एकत्र येऊन सायकलीवर पर्यावरण पूरक सायकल दिंडी आयोजीत करून नवीन पायंडा सुरु केला आहे”-प्रसाद नाईक,कोपरगाव.

संत ज्ञानेश्वर,संत एकनाथ,संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत.वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेद नाही.तसेच नामजपाने पुण्य मिळते हा भाव आहे.एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय.जो नियमित वारी करतो तो वारकरी.वारकरी धर्मालाच भागवत धर्म म्हटले जाते.’पंढरीचा वास,चंद्रभागेस्नान,आणिक दर्शन विठोबाचे’ या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे.या वाऱ्या दर आषाढीला आवर्जून राज्यभरातून जात असतात उत्तर नगर जिल्हयांतून कोपरगाव शहरातून उत्साही तरुणांनी यावर्षी पर्यावरण पूरक,’सायकल दिंडी’ आयोजीत केली आहे.दिंडीचे हे पहिलेच वर्ष आहे.

सालाबादप्रमाणे यावर्षी आज दिनांक १९ जुलै रोजी सकाळी ०६ वाजता कोपरगाव ते पंढरपूर सायकलवारी साईबाबा तपोभूमी येथून निघाली.पर्यावरणचा समतोल राखणे व आरोग्य निरोगी राहण्यासाठी सलग तिसऱ्या वर्षी सायकल संघाने हा लक्षवेधी उपक्रम राबवला आहे त्यासाठी कोपरगाव तालुक्याच्या माजी आ.स्नेहलता कोल्हे यांनी त्यांना शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

सदर प्रसंगी वारीसाठी अमृत संजीवनीचे अध्यक्ष पराग संधान,विजयराव आढाव,प्रशांत होन,प्रसाद नाईक,टाकळीचे सरपंच संदीप देवकर,विवेक खांडेकर,नितीन त्रिभुवन,बाळासाहेब निकोले,संतोष नेरे,संतोष पवार,दिनेश कोल्हे, अतुल सुराळकर,कैलास भैरट,मनोज आहेर,दिपक सुपेकर,प्रशांत निकुंभ,प्रशांत सहानी,सुधीर खर्डे,सचिन त्रिभुवन, उमेश गोसावी,उमेश लोंढे शंकर निकम,राजू निकम,प्रशांत सुराळकर,बापू सुराळकर,बंटी झावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close