कृषी विभाग
शिर्डीत साईबाबा समाधीवर हार-फुले चालू करा-मागणी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोरोना काळखंडाचे निमित्त करून बंद करण्यात आलेले साईबाबा मंदिर आणि परिसरात बंद केलेले हार आणि पुष्प गुच्छ शिर्डी येथील साईबाबा संस्थानने पूर्ववत सुरु करावे व शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करावा अशी महत्वपूर्ण मागणी माहिती अधिकार संजय काळे यांनी केली आहे.
“शिर्डी मध्ये पॉलिसी वाले भक्तांना लुटतात.पन्नासचा हार हजाराला विकतात,गुंडगिरी वाढते”असा काही लोक आरोप करत आहे.अनेक देवस्थानात हार फुले नेऊ देत नाही.साईबाबा संस्थानचे उत्पन्न वाढल्याचा दावा करून शेतकऱ्यांना इतर बाजारपेठ खुल्या असल्याचा दावा करत आहे तो हास्यास्पद आहे.गुन्हेगारीचे नाव पुढे करून संस्थान व्यवस्थापन व काही स्थानिक नेते संगनमताने शेतमालाला विरोध करीत आहे हे धक्कादायक आहे”-संजय काळे,माहिती अधिकार कार्यकर्ते,कोपरगाव.
शिर्डी येथील साईबाबा संस्थानने माहे जानेवारी २०२० नंतर कोरोना कालखंड देशात सुरु झाल्यावर केंद्र सरकारने देशभरात सतर्कता बाळगत देशातील धार्मिक व पर्यटन स्थळे आदी ठिकाणी कोरोना संसर्ग कमी व्हावा यासाठी हार तुरे घेण्यादेण्यासाठी प्रतिबंध केला होता.त्यामुळे शिर्डी,तिरुपती,पंढरपूर,तुळजापूर,जेजुरी व तत्सम धार्मिक ठिकाणी हार तुरे मंदिरात नेण्यासाठी प्रतिबंध केला होता.परिणामस्वरूप यावर अर्थाजन असलेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक अरिष्ठ कोसळले होते.आता मागील वर्षी कोरोना प्रतिबंध उठले असताना मात्र राज्यात अद्यापही धार्मिक तीर्थक्षेत्र आदी ठिकाणी देवादिकांना अर्पण करण्यात येणारे हारतुरे पूर्ववत केलेले नाही हे विशेष !
विशेष म्हणजे या बाबत शेतकरी पुत्र म्हणून दर निवडणुकीत आपला गवगवा करणारे नेते आणि पुढारी या बाबतच चकार शब्द बोलण्यास तयार नाही.मात्र याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी आवाज उठवला आहे.व शेतकऱ्यांवर आलेले आर्थिक अरिष्ठ दूर करण्यासाठी मागणी केली आहे.वास्तविक फुलशेती हि शेतकऱ्यांना दुधासारखे रोख चलन देणारी व वरदान ठरणारी आसल्याचे वारंवार सिद्ध झालेले आहे.तरीही त्याकडे दुर्लक्ष होणे हि बाब खटकणारी आहे.त्यामुळे शेतकरी आणि हार-तुरे विणणारे कर्मचारी यांच्यावर उपास मारीची वेळ आली आहे.त्यामुळे साईबाबा संस्थानचे विश्वस्त आणि प्रशासकीय अधिकारी यांनी याबाबत लवकरच निर्णय घेऊन या घटकांना न्याय द्यावा अशी मागणीही काळे यांनी शेवटी केली आहे.