कृषी विभाग
ब्राझिलच्या धर्तीवर सोयाबिन चे क्रांतिकारी उत्पादन भारतात-डॉ.वाघचौरे

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सोयाबिन हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक बनले आहे.विशेष म्हणजे भारतीय सोयाबिन हे नॉन जी.एम.ओ.प्रकारातील असल्यामुळे आखाती देशांमधून देखील मागणी वाढत आहे.सहाजिकच मागणी आणि पुरवठ्यामध्ये तफावत पडत असल्यामुळे मागच्या वर्षी शेतकऱ्यांना चांगले दर मिळाले.
चालु वर्षी सोयाबिनचा पेरा योग्य वेळी आणि चांगला झाला आहे.बऱ्याच ठिकाणी पाऊस मागे पुढे झाला,त्यामुळे उगवण कमी अधिक झाली आणि सध्या पावसाने जोर धरल्या मुळे देखिल काही प्रमाणात मररोग येवून एकरी रोपांची संख्या कमी झाल्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
नुकतेच परभणी येथे केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना,’डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी देवून सन्मानित केले त्या दरम्यान त्यांनी त्याच्या भाषणामध्ये ब्राझिल मध्ये हेक्टरी ३० क्विंटल सोयाबिन उत्पादन होत असल्याचे नमूद केले.तर विदर्भामध्ये ही सरासरी १२ ते १५ क्विंटल प्रति हेक्टरी असल्याचे सांगितले.शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे चांगले उत्पादन मिळण्यासाठी त्यांना चांगल्या तंत्रज्ञानाची गरज असल्याचे तिथे संशोधकांना आव्हान केले.
सध्याची वस्तुस्थिती बदलण्यासाठी सोयाबिनच्या,’पॅकेज ऑफ प्रॅक्टिस’ मध्ये काही बदल केल्यास भारतीय शेतकरी देखिल ३० क्विंटल प्रति हेक्टर उत्पादन घेवू शकतो आणि यासाठी अश्वमेध च्या माध्यमातून डॉ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी २०१० पासूनच मराठवाडा,विदर्भ येथिल दौरे करून सोयाबिन चे उत्पादन एकरी १५ ते १८ क्विंटल पर्यंत काढून देवून हे सिद्ध केले आहे.त्या मध्ये एकरी ३० किलो दर्जेदार बियाणे पेरणी पुर्वी बायोटेक किट ज्या मध्ये बायो फर्टीलायझर चा समावेश असून त्याची पाण्याशिवाय बीजप्रक्रिया करण्याचे सुचवले आहे,तसेच सोयाबिन ची फुटवा अवस्था २० ते २५ दिवसाच्या दरम्यान ‘एक्सपोजर’ या Biostumilant ची १ ते १.५ मि.ली. प्रति लिटर फवारणी व बायोटाॅकझिन या जैविक किटकनाशकांची फवारणी २.५ मिली प्रति लिटर आणि पुन्हा ४० ते ४२ दिवसांत दुसरी फवारणी असे ‘पॅकेज ऑफ प्रॅक्टिस’ जिथे जिथे शेतकऱ्यांनी केले तिथे तिथे एकरी १२ ते १५ क्विंटल सोयाबिन उत्पादन आरामात मिळाल्याच्या प्रतिक्रिया आपल्याला मिळाल्या आहेत.
त्यामुळे चालु हंगाम शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा असून लक्ष ३० क्विंटल प्रति हेक्टर ठेवून काम केल्यास फळपिके व भाजीपाला पिकांपेक्षा चांगले उत्पादन सोयाबिन मधून शेतकऱ्यांना मिळू शकते असे कीटक तज्ज्ञ डाॅ.ज्ञानेश्वर वाघचौरे यांनी प्रसिद्धी पत्रकात शेवटी म्हटले आहे.