कृषी विभाग
काकडीत आधुनिक शेती मार्गदर्शन शिबिर उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काकडी येथील रहिवाशी व महात्मा फुले कृषी विद्यापीठाशी संलग्न भानस हिवरे ता.नेवासे येथील कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी विकी संजय गुंजाळ याने अंतिम वर्षात शिक्षण घेत असताना काकडी येथे प्रत्यक्ष शेतात जाऊन त्या परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक व जैविक बीज उपचारा संबंधी आधुनिक शेती विषयक मार्गदर्शन केले आहे.त्याच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदर प्रसंगी कृषी दूत विकी गुंजाळ यांने ग्रामीण कृषी जागृतता आणि औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम २०२०-२१ या अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. वर्तमानात कोरोना विषाणूच्या साथीमुळे विद्यार्थी हे प्रशिक्षण ऑनलाइन घेत असल्याने त्यांनी आपल्या नजीकच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावयाचे आहे.
विकी गुंजाळ याने शेतकऱ्यांना सुरक्षिततेचे उपाय,सामाजिक अंतर,तसेच बाजार पेठेत गेल्यावर घ्यावयाची काळजी,या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.या अभ्यास दौऱ्यात दोन महिन्याच्या कालावधीत माती पाणी व्यवस्थापन,कीड रोग संरक्षण,आदी बाबत मार्गदर्शन केले आहे.
सदर प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य इंद्रभान हरी गुंजाळ,बाळासाहेब गुंजाळ,संतोष गुंजाळ,असेच शाळेचे मुख्याध्यापक श्री सोनवणे,आदी मान्यवर उपस्थित होते.
विकी गुंजाळ यास भानस हिवरे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अतुल दरंदले,कार्यक्रम समन्वयक एम.आर.माने,कार्यक्रम अधिकारी सी.के.गाजरे,पी.बी.काळे आदींचे मार्गदर्शन लाभले होते.