जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

आधुनिक कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज-आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतकरी शेतात अनेक प्रयोग करून विविध प्रकारचे पिके घेतात मात्र केलेल्या खर्चाच्या तुलनेत सर्वच शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी माती परीक्षण गरजेचे असून कोणतेही पिक घेतांना त्या पिकाला पोषक अन्द्रव्य आहे का याची खातरजमा करून त्या पिकाला आवश्यक असणारी खतांची मात्रा देणे गरजेचे आहे.त्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे असून कृषी संजीवनी तंत्रज्ञान मेळाव्याच्या माध्यमातून मार्गदर्शन मिळणार असले तरी शेतकऱ्यांनी आधुनिक पिक तंत्रज्ञान आत्मसात करणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच माहेगाव देशमुख येथील कार्यक्रमात बोलताना केले आहे.

“खरीप हंगामावर शेतकऱ्याचे वर्षभराचे अर्थकारण अवलंबून असते. यातच शेतीवरील खर्च ही सर्वात मोठी बाब आज बनली आहे.अशाही स्थितीत उत्‍तम नियोजन,आधुनिक तंत्रज्ञान व इच्‍छाशक्‍ती असल्‍यास सर्व काही शक्‍य होते असा आधुनिक शेतकऱ्यांचा अनुभव आहे त्यासाठी आधुनिक शेतीची कास धरणे गरजेचे आहे”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव विधानसभा.

कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथे महाराष्ट्र शासन व तालुकाकृषी विभाग कोपरगाव यांच्या वतीने मौजे माहेगाव देशमुख कृषी संजीवनी मोहिमे अंतर्गत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना ते बोलत होते.

सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीच्या सभापती पोर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,संशोधक पोपटराव खंडागळे, तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल अधिकारी अविनाश चंदन,संभाजी काळे,मधुकर काळे,माहेगाव सोसायटीचे अध्यक्ष रवींद्र काळे रावसाहेब काळे, रामनाथ जाधव, मच्छिंद्र जाधव, बापूसाहेब जाधव, इंद्रभान पानगव्हाणे,के.पी.रोकडे,कुंभारीचे सरपंच प्रशांत घुले,वसंत घुले,माती पाणी लॅबचे संतोष वाघमारे,अंकुश पवार, कृषी पर्यवेक्षक पांडुरंग जाधव,कृषी सहाय्यक नीलेश बिबवे,तुषार वसईकर,विजय अहिरे,सुनील सोनवणे आदींसह शेतकरी उपस्थितीत होते.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी शास्त्र शुद्ध पद्धतीने शेती करण्यासाठी महाविकास आघाडी शासनाच्या माध्यमातून २१ जून ते १ जुलै या कालावधीत शेतकऱ्यांच्या बांधावर पिक तंत्रज्ञान पोहोचवून पारंपारिक पद्धतीच्या पुढे जावून आधुनिक पद्धतीने शेती करून शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी प्रयत्नशील आहे.यासाठी कोपरगाव तालुका कृषी विभाग अतिशय चांगले काम करीत असून शेती शाळा सारख्या उपक्रमात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. प्रगत शेती करण्यासाठी शेती संशोधनातून रोज नवनवीन गोष्टीचा उलगडा होत आहे.ठरलेल्या वेळेत आवश्यक ती कामे पूर्ण करून त्यातून चांगल्या गोष्टी घेवून उत्पन्न घ्यावे.निसर्गाचे आपल्या हातात नाही.मात्र योग्य वेळी योग्य गोष्टी केल्या व योग्य मार्गदर्शन घेतले तर निश्चितपणे शाश्वत उत्पन्न मिळेल असा विश्वास आ.काळे यांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी केले.यावेळी सोयाबीन व ऊस पीक लागवड तंत्रज्ञान यावर संशोधक पी. पी. खंडागळे यांनी मार्गदर्शन केले.कृषी सहायक निलेश बिबवे यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखवत माहिती दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कृषी सहायक निलेश बिबवे यांनी केले तर मंडल कृषी अधिकारी अविनाश चंदन यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रावसाहेब काळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close