कृषी विभाग
कोपरगाव खरीप हंगामाचे नियोजन,बत्तीस शेती शाळा होणार संपन्न-ता.कृ.अधिकारी
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
चालू खरीप हंगामात तालुक्यांमध्ये सोयाबीन,मका,कपाशी व ऊस पिकाच्या एकूण बत्तीस शेतीशाळा घेण्याचे नियोजन आहे.त्यापैकी सात महिला शेती शाळा संपन्न झाल्या असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांनी दिली आहे.
“कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध होण्यासाठी ८६ शेतकरी गटांनी विविध कृषी सेवा केंद्रातून आज आखेर ३१० मे.टन रासायनिक खताची उचल केली आहे व त्यामध्ये ८८० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे”-अशोक आढाव,कोपरगाव तालुका कृषी विभाग.
त्यानी दिलेल्या माहितीत पुढे म्हटले आहे की,”सन-२०२० मध्ये सोयाबीन खाली २१ हजार ५५३ हेक्टर क्षेत्र होते.सन-२०२१ मध्ये २२ हजार ५९५ हेक्टरवर लागवडीचे नियोजन केले आहे. सन-२०२० मध्ये १० हजार २७१ क्विंटल शेतकऱ्यांकडील बियाण्याचा पेरणीसाठी वापर झाला व घरचे बियाणे वापरून १३ हजार ६९५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
चालू खरीप हंगामात शेतकऱ्यांकडील घरचे बियाणे वापरासाठी नियोजन करण्यात आले.तालुक्यातील १ हजार २७४ शेतकऱ्यांकडे २१ हजार ५७६ क्विंटल बियाणे इतर शेतकऱ्यांना पेरणीसाठी राखून ठेवलेले आहे.शेतकऱ्यांनी स्वतःचे बियाणे पेरणीसाठी वापरावे यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली. त्यासाठी शेतकऱ्यांनी राखून ठेवलेल्या बियाण्याच्या उगवण क्षमता चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
आज आखेर ०२ हजार १०९ उगवण क्षमता चाचण्या घेण्यात आल्या आहेत व त्यामध्ये ०२ हजार २३९ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.घरचे बियाणे वापरत असताना त्यांना कीड रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये व उगवण चांगली होण्यासाठी तसेच रासायनिक खतांचा वापर कमी होण्यासाठी रासायनिक व जैविक बुरशीनाशके व जिवाणू खतांच्या बीज प्रक्रिया करण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके घेण्यात आली.आज आखेर एकूण-८३७ बीज प्रक्रिया प्रात्यक्षिके घेण्यात आली व त्यामध्ये ०१ हजार ७५२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला.कोरोना महामारी च्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बांधावर खते उपलब्ध होण्यासाठी ८६ शेतकरी गटांनी विविध कृषी सेवा केंद्रातून आज आखेर ३१० मे.टन रासायनिक खताची उचल केली आहे व त्यामध्ये ८८० शेतकऱ्यांना लाभ मिळाला आहे.
चालू खरीप हंगामात एकूण छपन्न प्रकल्पामध्ये ५६० हेक्टर मध्ये पीक प्रात्यक्षिके राबविण्याचे नियोजन आहे.त्यासाठी शेतकऱ्यांकडून व शेतकरी गटांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.सदर अर्जांची सोडत प्रक्रिया शासन स्तरावर पूर्ण झाल्यावर सोडतीत निवड झालेल्या गटांची पिक प्रात्यक्षिकासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आढाव यांनी शेवटी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.