कृषी विभाग
काकडीत शेतीदिन उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे तृणधान्य प्रकल्पाचा शेतीदिन तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला आहे.
नाचणी, नागली, वरी इ. यासारख्या बारीक तृण धान्यांमध्ये इतर तृणधान्यांच्या तुलनेत जास्त कॅलशियम, फॉसस्फरस, लोह, अमिनो असिड, व्हिटमिनचे प्रमाणही अधिक असते. त्यामुळे नाचणी, नागली यासारख्या तृण धान्य पिकांकडे कानाडोळा करुन चालणार नाही. तृणधान्यांमधील कॅल्शियम, फॉसस्फरस, लोह, अमिनो ऍसिड, यासारखे घटक आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवितात आणि मधुमेय, रक्तदाब, हृदयविकार यांसारख्या आजारापासून दूर ठेवतात
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली तृणधान्य रब्बी ज्वारी पिकाचा शेतकरी शेतीदिन कार्यक्रम मौजे काकडीचे आनंदवाडी येथे सोनवणे वस्तीवर घेण्यात आला.
सदर कार्यक्रमासाठी मंडळ कृषी अधिकारी माधुरी गावडे मॅडम,कृषी पर्यवेक्षक श्री.भोसले, कृषी सहाय्यक दिनकर कोल्हे,शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे,काकडीचे माजी सरपंच अनिल सोनवणे,प्रगतशील शेतकरी पावलस सोनवणे,नितीन सोनवणे,प्रकाश सोनवणे,भाऊसाहेब सोनवणे सह प्रकल्पातील ज्वारी उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमांमध्ये प्रामुख्याने रब्बी ज्वारी पिकाचे अर्थशास्त्र,पिकाचे आरोग्य दृष्टीकोनातून आहारातील महत्त्व,त्याचबरोबर ज्वारी पिकांपासून तयार करण्यात येणारी लाह्या,हुरडा,पापड सारखे प्रक्रियायुक्त पदार्थ,त्याचबरोबर आता सध्या शेतामध्ये उभ्या असलेल्या कांदा पिकाचे कीड-रोग सर्वेक्षण खत व पाणी व्यवस्थापन आदी तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन शेतीशाळा प्रशिक्षक निलेश बिबवे यांनी केले.
यावेळी विभागाच्या योजनांबाबत दिनकर कोल्हे यांनी माहिती दिली.शेतकऱ्यांनी ज्वारी व कांदा पिकाच्या प्रक्षेत्र ला भेट दिली.कामाचा हंगाम असूनही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचा चांगला उत्साह व सहभाग लाभला.
सदर कार्यक्रमासाठी मंडल कृषी अधिकारी श्रीम.माधुरी गावडे मॅडम यांनी हरभरा घाटेअळी नियंत्रण व खरीप हंगाम २०२१ साठी गुणवत्तापूर्ण सोयाबीन बियाणे साठवण व वापर याबाबत माहिती दिली.कृषी पर्यवेक्षक दिलीप भोसले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले आहे.