जाहिरात-9423439946
कृषी विभाग

मुर्शतपुर,चांदगव्हाण परिसरात पावसाचा धुमाकूळ

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
परतीचा पाऊस अजूनही जायचे नाव घेत नसून गुरुवारी रात्री सात वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने कोपरगाव तालुक्यातील मुर्शतपूर, चांदगव्हाण परिसरात दाणादाण उडवून देत अनेक घरांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करून आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेस चंद्रे यांना पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मुर्शतपूर,चांदगव्हाण आदी गावांमध्ये रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे.व झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून केल्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजल्यामुळे मोठे झाले आहे तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. त्यांना तातडीच्या मदतीची गरज आहे.

गुरुवार दि.२२ ऑक्टोबर रोजी मुर्शतपूर,चांदगव्हाण आदी गावांमध्ये रात्री अचानक वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला आहे.व झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरांचे पत्रे उडून केल्यामुळे संसारोपयोगी साहित्य भिजल्यामुळे मोठे झाले आहे तर अनेकांचे संसार उघड्यावर आले आहे. तसेच काही ठिकाणी घराच्या भिंती पडून जनावरांच्या पत्र्याचे शेड,गोठे उडून गेले आहे. वाऱ्याचा वेग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे काही ठिकाणी शेतातील उभी पिके जमिनीवर पडून पिकांचे नुकसान झाले. तसेच अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे पडल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. घरांच्या झालेल्या नुकसानीची आ. आशुतोष काळे यांनी पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांची चौकशी करून नागरिकांना दिलासा दिला आहे. झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या महसूल विभागाला सूचना देताच तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्षात पंचनामे करण्यात सुरुवात झाली आहे. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याचे अहवाल तातडीने सादर करन्याचे निर्देश दिले आहे.नुकसानग्रस्त नागरिकांना लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्वासन आ.काळे यांनी यावेळी दिले.

यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे
,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक हरिभाऊ शिंदे,अनिल दवंगे, सुनील गिरमे,विष्णू शिंदे,नितीन शिंदे,शिवाजी बाचकर,विक्रम बाचकर,नुकसानग्रस्त नागरिक आदी उपस्थित होते.

Related Articles

Close