जनशक्ती न्यूजसेवा
श्रीरामपूर -(प्रतिनिधी)
परीसरात गेल्या आठ दहा दिवसापासुन सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळे खरीपाची सोयाबीन,मका,बाजरी,कपाशी,भुईमुग,चारापिके पाण्याखाली गेल्याने काढणीस आलेल्या पिकात पाणी साचल्याने मोठे नुकसान झालेले आहे.याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात होती त्याची दाखल घेण्यात आली आहे.
परीसरात गेल्या आठ दहा दिवसापासुन सुरु आसलेल्या मुसळधार पावसामुळे खरीपाची सोयाबीन,मका,बाजरी,कपाशी,भुईमुग,चारापिके पाण्याखाली गेल्याने काढणीस आलेल्या पिकात पाणी साचल्याने मोठे नुकसान झालेले आहे.याबाबत नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांकडुन केली जात होती.आ.लहु कानडे यांनी महसुल व कृषी विभागाला नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार आ.कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळीभान पंचायत समिती गणाच्या सदस्या डाॕ. वंदना मुरकुटे यांनी महसुल व कृषी विभागाच्या पथकाला सोबत घेवुन टाकळीभान व भोकरची शिवारफेरी करुन नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे सुरु केले आहेत.यावेळी भोकर येथील पडझड झालेल्या घराचीही डाॕ. मुरकुटे यांनी पहाणी केली आहे.