कृषी विभाग
…या तालुक्यात शेतकऱ्यांचा वाढला केळी उत्पादनाकडे कल !

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात केळी उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणावर वळत असून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (एम.आर.ई.जी.एस.) अंतर्गत केळी लागवडीला चांगला प्रतिसाद मिळत असून या शेतीला जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी भेट दिली असल्याची माहिती कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी आमचे प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

सन-1953 साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कोपरगावला भेट दिली होती.व कोपरगावचे वर्णन भारताचा कॅलिफोर्निया असे केले होते.मात्र उत्तरोत्तर राजकीय अनास्थेतून शेती सिंचनाचे पाणी उद्योग आणि महानगरंकडे वळवले गेले आणि उत्तर नगर जिल्ह्यातील संत्रा आणि त्या पाठोपाठ ऊस शेती उध्वस्त झाली आहे.आता सरकारने या भागात केळीची शेती वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
राज्यात एकेकाळी जळगाव जिल्हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.मात्र आता हे चित्र वेगाने बदलत असून सोलापूर जिल्हा केळी उत्पादन आणि निर्यातीचे नवे केंद्र म्हणून उदयास येत आहे.उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामुळे उपलब्ध झालेले मुबलक पाणी,अनुकूल हवामान आणि आधुनिक शेती पद्धती यांचा परिणाम म्हणून गेल्या पाच वर्षांत सोलापूर जिल्ह्यात केळी लागवडीत लक्षणीय वाढ झाली आहे.या वाढीबरोबरच केळी निर्यातीचा आलेखही सातत्याने वर चढताना दिसत आहे.त्यापूर्वी कोपरगाव आणि उत्तर नगर जिल्हा संत्रा या उत्पादनासाठी प्रसिद्ध होता.सन-1953 साली तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी कोपरगावला भेट दिली होती.व कोपरगावचे वर्णन भारताचा कॅलिफोर्निया असे केले होते.मात्र उत्तरोत्तर राजकीय अनास्थेतून शेती सिंचनाचे पाणी उद्योग आणि महानगरंकडे वळवले गेले आणि उत्तर नगर जिल्ह्यातील संत्रा आणि त्या पाठोपाठ ऊस शेती उध्वस्त झाली आहे.आता सरकारने पुन्हा एकदा या भागात केळीची शेती वाढावी यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.त्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत केळी लागवडीला प्रोत्साहन दिले जात आहे.आणि विशेष म्हणजे शेतकरी त्याला प्रतिसाद दिला आहे.

दरम्यान काल दि.4 फेब्रुवारी रोजी मौजे-रवंदे येथे नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पंकज आशिया यांनी मनरेगा योजनेअंतर्गत केळी लागवड क्षेत्राची पाहणी करून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे.
सदर प्रसंगी शिर्डी येथील प्रांताधिकारी माणिक आहेर,कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे,संचालक प्रवीण कदम,रवंदे शेतकरी उत्पादक कंपनी,कृषी मंडळ अधिकारी तेजस्वी मोटे,उपकृषी अधिकारी राजेश तुंबारे,कृषी सहाय्यक योगेश माळी आदीसह धामोरी-रवंदे तसेच लाभार्थी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी त्यांनी केळी पिकाची वाढ,व्यवस्थापन तसेच शेतकऱ्यांना मिळणाऱ्या लाभांची माहिती घेतली आहे.कोपरगाव तालुक्यातील सुमारे २२ हेक्टर क्षेत्रावर केळी लागवड महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेतून करण्यात आली असून अनेक शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.विशेषतः रवंदे येथील रवंदे शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांनी योजनेतून केळी लागवड करून उत्पादन वाढीसाठी पुढाकार घेतला आहे.आपल्या भागातील पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून केळी फळपीकाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पन्नवाढ साधावी व शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.



