जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

..या ठिकाणी कृषी महोत्सव उत्साहात संपन्न !

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ ला अहिल्यानगर जिल्ह्यासह छ.संभाजीनगर व नासिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी भेट देवून कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाला शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवण्यासाठी अधिकची उर्जा मिळाली आहे.असंख्य शेतकऱ्यांनी या कृषी महोत्सवाला भेट देवून आधुनिक शेतीचे ज्ञानधन आणि तंत्रज्ञानाची संपदा अवगत केली असल्याचे प्रतिपादन आ.आशुतोष काळे यांनी नुकतेच केले आहे.

  

  दरम्यान या महोत्सवात कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान झालेल्या आजारावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले आहे.

   नगर जिल्ह्यातील कृषी आणि संलग्न क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान,आधुनिक शेती पद्धती याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलच्या मैदानावर तीन दिवस पार पडलेल्या कर्मवीर कृषी महोत्सवाची मोठ्या उत्साहात नुकतीच सांगता झाली आहे.यावेळी आ.आशुतोष काळे यांनी कर्मवीर कृषी महोत्सवातील प्रत्येक स्टॉल्सला भेट देवून याबबत माहिती जाणून कृषी महोत्सवाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

   सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले की,”शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.शेतकऱ्यांच्या प्रगतीशिवाय देशाची प्रगती अशक्य आहे.शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आयोजित कर्मवीर कृषी महोत्सवात विविध आधुनिक शेती तंत्रज्ञानाचे प्रात्यक्षिके,कृषी क्षेत्रातील नवकल्पना,शाश्वत शेतीसाठी मार्गदर्शन सत्रे तसेच शेतकरी-उद्योग संवाद या सर्व कार्यक्रमांना प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान,ज्ञान आणि प्रयोगशीलतेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेती व्यवसायाला प्रगत करण्याचे कामगिरी या कर्मवीर कृषी महोत्सवातून साध्य होणार आहे.

   अहिल्यानगर जिल्ह्यासह छ.संभाजीनगर व नासिक जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे.या महोत्सवात कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळ व संत जनार्दन स्वामी हॉस्पिटल कोकमठाण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्व रोग निदान शिबिरात अनेक शेतकऱ्यांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून निदान झालेल्या आजारावर तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घेतले.यावेळी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले.

   दरम्यान आ.काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे मित्र मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष,सर्व सदस्य तसेच कारखान्याचे उपाध्यक्ष,संचालक मंडळ,कारखान्याचे कार्यकारी संचालक,महव्यवस्थापक,आसवणी विभागाचे महाव्यवस्थापक,सचिव,सहसचिव,ऊस विकास विभाग तसेच सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी कर्मवीर कृषी महोत्सव २०२५ यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close