जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

…या तालुक्यात ५३ कुटुंबे विस्थापित होण्याची भीती,!०२ घरे पडली,आपत्कालीन पथक पाचारण!

न्यूजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव तालुक्यात गत चोवीस तासात पावसाने जोरदार हजेरी लावली असून जवळजवळ ११३ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे.तालुक्यातील दहीगाव बोलता मंडल सर्वाधिक प्रभावित झाले असून त्यासह तालुक्यातील जवळपास ५३ कुटुंब स्थलांतरीत केले असून त्यात कोपरगाव बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके यांच्यासह २०० नागरिकांचा समावेश असल्याची माहिती कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी दिली आहे.शिवाय कोळगाव थडी येथील शांताबाई मुरलीधर उदावंत यांचेसह शहरात एक घर पडले असल्याची माहिती असून संवत्सर परिसरात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.

दरम्यान वारी शिवारात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके यांचेसह ५३ कुटुंबातील २०० जण पूर पाण्यात अडकले आहे.त्यांच्या सोडतीसाठी तालुका प्रशासनाने एन.डी.आर.एफ.चे पथक पाचारण केले आहे.तर एक जल बोट मागवली असल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे.

    पुणे वेधशाळेने महाराष्ट्रात आगामी काही तासात अहिल्यानगर,हिंगोली,नांदेड,परभणी, पुणे या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली होती.तसेच ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळे वारे वाहतील असा अंदाज वर्तवला होता.तो काल सायंकाळ पासून खरा ठरला असून आज दुपारपर्यंत पावसाने सततधार पावसाने हजेरी लावली असल्याने त्याचा सर्वाधिक फटका कोपरगाव पूर्व भागास बसला असून संवत्सर परिसरातील दशरथवाडी,रामवाडीसह पूर्व भाग झोडपून काढला असून मका,ऊस पिके आडवी केली आहे.काढणीस आलेल्या सोयाबीन पाण्यात तरंगताना दिसत असून अनेक ठिकाणी वाहून गेल्या आहेत.कांदा चाळी जलमय झाल्या आहेत.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याचे लक्ष सरकारी निर्णयाकडे लागले असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी शिवाजी गायकवाड यांनी दिली आहे.

सांगावी भुसार येथील जलमय झालेली मालाचे पिक.

   दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील परिसर पावसाने जलमय केला असून त्यात अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके होत्याची नव्हती झाली आहे.येथील महिला शांताबाई मुरलीधर उदावंत यांचेसह शहरात एक घर पडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

  दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोळगाव थडी येथील परिसर पावसाने जलमय केला असून त्यात अनेक शेतकऱ्यांची खरीप पिके होत्याची नव्हती झाली आहे.येथील महिला शांताबाई मुरलीधर उदावंत यांचेसह शहरात एक घर पडले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.

कोपरगाव तालुक्यात गोदावरीला पूर आल्याने पाण्याने मौनगिरी पुलावरून झेप घेतली असल्याचे दिसून आले आहे.

  दरम्यान वारी शिवारात कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती मधुकर टेके यांचेसह ५३ कुटुंबातील २०० जण पूर पाण्यात अडकले आहे.त्यांच्या सोडतीसाठी तालुका प्रशासनाने एन.डी.आर.एफ.चे पथक पाचारण केले आहे.तर एक जल बोट मागवली असल्याची माहिती नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी दिली आहे.मात्र तालुक्यात अद्याप जीवित हानी झाल्याची खबर मिळालेली नाही हे सुदैव ठरले आहे.घटनास्थळी स्वतः कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत आपल्या सहकाऱ्यांना घेऊन तळ ठोकून आहेत.

संवत्सर शिवारात जलमय झालेली खरीप पिके.-छााचित्रकार,शिवाजी गायकवाड.

   कोपरगाव-सिन्नर तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या शहापूर पाझर तलाव आधीच निळवंडे पाण्याने भरलेला असताना पुन्हा काल सायंकाळी पावसाने जोरदार सलामी दिल्याने काठोकाठ भरला असल्याची माहिती तेथील सरपंच योगिता रमेश डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्या ठिकाणी शहापूर,जवळके,बहादरपूर,सिन्नर तालुक्यातील पाथरे परिसरातील शेतकऱ्यांनी सांडव्यानाजिक गर्दी केली आहे.

   दरम्यान कोपरगाव सिन्नर तालुक्यातील सीमारेषेवर असलेल्या शहापूर पाझर तलाव आधीच निळवंडे पाण्याने भरलेला असताना पुन्हा काल सायंकाळी पावसाने जोरदार सलामी दिल्याने काठोकाठ भरला असल्याची माहिती तेथील सरपंच योगिता रमेश डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.त्या ठिकाणी सांडवा काही शेतकऱ्यांनी बंद केला असल्याने सदर पाझर तलाव फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.परिणामी या ठिकाणी शहापूर,जवळके,बहादरपूर,सिन्नर तालुक्यातील पाथरे परिसरातील शेतकऱ्यांनी सांडव्यानाजिक गर्दी केली आहे.याबाबत कोपरगाव तहसील कार्यालयाशी नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी बांधकाम विभागाचा एक कनिष्ठ अभियंता यांना नियंत्रण ठेवण्यास घटनास्थळी पाचारण केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीला दिली असून खबरदारी घेतली जात असल्याची माहिती दिली आहे.

   कोपरगाव तालुक्यातील सांगवी भुसार येथे पावसाने जोरदार सलामी दिल्याने मका,कापशी,सोयाबीन आदी पिके पाण्याखाली गेले असून कांदा चाळीचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती रावसाहेब जाधव यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

                 ————————————-

तांत्रिक अडचणीमुळे आपल्याला रोज पोहच बातम्या पाठवणे अवघड होत असल्याने आपल्याला रोज ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी खालील लिंक वर जावून न्यूजसेवा ग्रुपला जॉइन व्हा.

*नियमित विश्वसनीय बातम्यासाठी ‘न्यूजसेवा’ वर क्लिक करा आणि खालील लिंकवर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*
https://bit.ly/newsseva2024
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close