जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कृषी विभाग

परतीच्या पावसाच्या नुकसानीचे पंचनामे करा…यांच्या सूचना ?

न्यूजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

   कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांना नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसाचा फटका बसला असून काढणीला आलेल्या खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. याची दखल घेवून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी तहसीलदार महेश सावंत व तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना दिल्या आहेत.

 

दरम्यान आतापर्यंत कोपरगाव तालुक्यात केवळ  पन्नास टक्के पाऊस झाला असून दोन दिवसात ती आकडेवारी सत्तर टक्क्यांवर गेली असल्याची माहिती कृषी अधिकाऱ्यांनी दिली आहे.मात्र पूर्व भागात पुर पाणी आणि काही शेतकऱ्यांनी घातलेले बांध आदींनी काही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याची कबुली कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी दिली आहे.

  कोपरगाव मतदार संघातील पढेगाव,कासली,शिरसगाव,तिळवणी,तळेगाव मळे,दहेगाव,लौकी,धोत्रे,खोपडी,भोजडे आदी गावांना सोमवार दि.२२सप्टेंबर रोजी मध्यरात्रीनंतर झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा बसला होता.सोमवारी मध्यरात्रीनंतर जवळपास तीन तास झालेल्या मुसळधार पावसाने शेतीची दाणादाण उडवून दिली.या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतात साचल्यामुळे शेतातील उभी पिके ऊस,मका,कपाशी,कांदा रोप,बाजरी,तूर आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

   राज्यात सर्वत्र परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून आजपर्यंत कोपरगाव मतदार संघ या परतीच्या पावसापासून सुरक्षित होता.परंतु सोमवारी रात्री या परतीच्या पावसाने पूर्व भागातील अनेक गावांना चांगलेच झोडपले त्यामुळे  या पावसाचा मुख्यत: फटका काढणीला आलेल्या बाजरी,मका,तूर,कपाशी या पिकांना बसला असून शेतातील हि पिके पाण्यात आहेत.शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने शेतात पेरणी केली होती.काही दिवसांत या पिकांची काढणी होणारच होती मात्र झालेल्या मुसळधार पावसाने पूर्व भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

   सदर नैसर्गिक आपत्ती बाबत झालेल्या नुकसानीची माहिती समजताच आ.काळे यांनी तहसीलदार महेश सावंत,तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांना झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.नुकसान भरपाई बाबत शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close