कृषी विभाग
ऊस पिकावर…या रोगाचा प्रादुर्भाव,शेतकरी अडचणीत !

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
वर्तमान काळात पावसाळी वातावरण असल्याने उत्तर नगर जिल्ह्यातील कोपरगाव,राहाता तालुक्यात लोकरी माव्याचा मोठा प्रादुर्भाव असून शेतकरी चिंतेत आहे.याबाबत कृषी विभागासह सहकारी साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत करण्याची गरज निर्माण झाली आहे.

“वर्तमानात ढगाळ वातावरणात मध्येच ऊन पडल्यावर उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे पानावर काळे पांढरे ठिपके पडतात.त्याचा ऊस उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असून त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पीक लहान असेल तर पाठीवरील स्प्रे पंपाने तर ऊस पीक मोठे असेल तर ड्रोनच्या सहाय्याने प्रतिबंधक औषधांची फवारणी करून ऊस पिकांचे संरक्षण करावे”-सुनील कोल्हे,कार्यकारी संचालक,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना.गौतमनगर.
याबाबत सविस्तर वृत् असे की,”ऊस हे राज्यातील शेतकऱ्यांचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते.मात्र त्याला २००२ पासून लोकरी माव्याने ग्रासले असल्याचे दिसून येते.यात ऊस पानांच्या खालच्या बाजूस लोकरी मावा दिसतो.पंखी माव्याची मादी काळसर असून,बिनपंखी माव्याची मादी पांढऱ्या रंगाची असल्याने तिला पांढरा लोकरी मावा म्हणतात.या किडीचा प्रसार वारा,मुंग्या,तसेच किडग्रस्त पाने किंवा बेण्यांद्वारे होतो.पिल्ले व प्रौढ माद्या पानांचा रस शोषून पिकाला नुकसान पोहोचवतात.त्यामुळे पानांच्या कडा सुकतात,काळी बुरशी वाढते,आणि ऊस कमकुवत होतो.याचा परिणाम उत्पादनात व साखर उताऱ्यावर होतो.ढगाळ हवामान व ७०-९५% आर्द्रता ही परिस्थिती या किडीच्या वाढीस पोषक असते.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून,किडग्रस्त ऊस बियाणे नवीन लागवडीसाठी वापरू नये.ऊस लागवड पट्टा किंवा रुंद सरी पद्धतीने करावी.सुरुवातीस मावा आढळल्यास प्रादुर्भावग्रस्त पाने काढून जाळून टाकावीत व पाण्याचा अतिरेक टाळावा असे आवाहन कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

“ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी “पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी डेन्टाॅसु ०.३ ग्रॅम प्रति लिटर + साफ २ ग्रॅम प्रिति लिटर एकत्र फवारणी करावी,पाण्यासोबत किंवा ड्रिपमधून डेन्टाॅसु १०० ग्रॅम प्रति एकरी वापर करून या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखावा”- मनोज सोनवणे,कृषी अधिकारी, कोपरगाव तालुका कृषी विभाग.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक सुनील कोल्हे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी वर्तमानात उसावर लोकरी मावा असल्याचे खंडन केले असून ढगाळ वातावरणात मध्येच ऊन पडल्यावर उसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होतो.त्यामुळे पानावर काळे पांढरे ठिपके पडतात.त्याचा ऊस उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होत असून त्यासाठी शेतकऱ्यांनी ऊस पीक लहान असेल तर पाठीवरील स्प्रे पंपाने तर ऊस पीक मोठे असेल तर ड्रोनच्या सहाय्याने प्रतिबंधक औषधांची फवारणी करून ऊस पिकांचे संरक्षण करावे असे आवाहन केले आहे.
दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी,”ऊस हे प्रमुख नगदी पीक असून,त्यावर सुमारे २८८ प्रकारच्या कीटक व अकीटकवर्गीय किडी आढळून येतात.एकेकाळची दुय्यम समजली जाणारी पांढरी माशी ही आता मुख्य कीड झाली आहे.राज्यामध्ये या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे.या किडीमुळे उसाच्या उत्पादनात २६ ते ८६ टक्के व साखरेच्या उताऱ्यात १.४ ते १.८ टक्के घट झाल्याचे आढळून आले आहे.
शेतामध्ये पाणी साचून राहणाऱ्या जमिनीत व पिकाला पाण्याचा ताण पडल्यास अशा दोन्ही परिस्थितीत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव वाढतो.असे सांगून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी “पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी डेन्टाॅसु ०.३ ग्रॅम प्रति लिटर +साफ २ ग्रॅम प्रिति लिटर एकत्र फवारणी करावी,पाण्यासोबत किंवा ड्रिपमधून डेन्टाॅसु १०० ग्रॅम प्रति एकरी वापर करून या पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव रोखावा असे आवाहन केले आहे.