कृषी विभाग
…या तालुक्यात जीवामृत मोहीम सुरु

न्युजसेवा
धामोरी -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुका कृषी अधिकारी या कार्यालयाने नैसर्गिक शेती,सेंद्रिय शेती प्रचार व प्रसिद्धी करणे कामी तसेच रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी आज तालुक्यात सर्व गावांमध्ये जीवामृत तयार करणे प्रात्यक्षिक मोहीम तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या संकल्पनेतून राबवण्याचे ठरवले असून या मोहिमेअंतर्गत नुकतेच धामोरी येथे कार्यकर्ते कैलास माळी यांच्या वस्तीवर जीवामृत बनविण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले आहे.

“सेंद्रिय शेती पद्धती पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर आहेत कारण त्यात कमी प्रदूषण,मातीचा ऱ्हास आणि शक्ती यांचा समावेश होतो.शेतीतील कीटकनाशकांचा वापर दूर केल्याने जवळपासचे पक्षी आणि प्राणी तसेच शेताच्या जवळ राहणारे लोक यांना फायदा होतो.त्यामुळे या नैसर्गिक शेतीला सरकार आणि कृषी विभाग प्रोत्साहन देत आहे”- मनोज सोनवणे,तालुका कृषी अधिकारी,कोपरगाव.
भारताने उच्च परतावा देणार्या बियाण्याच्या जाती,मातीचे पोषण करण्यासाठी खते आणि पिकांचे नुकसान टाळण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करून अन्न सुरक्षा मिळवली.तथापि,खतांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाची हानी झाली,ज्याचा मानवी आणि पर्यावरणीय आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे.पीक वापराशी संबंधित नायट्रोजन आणि फॉस्फरस यांसारख्या रासायनिक खतांनी माती पुन्हा भरली पाहिजे या विश्वासावर आधुनिक शेतीचे मूळ आहे.रसायनांच्या वापरामुळे सूक्ष्मजीवांची संख्या कमी होते आणि या नैसर्गिक प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो.त्याचप्रमाणे सेंद्रिय शेतीमध्ये शेणासारखे सेंद्रिय खत टाकून माती पुन्हा भरली जाते.सेंद्रिय शेती पद्धती पर्यावरणासाठी अधिक फायदेशीर आहेत कारण त्यात कमी प्रदूषण,मातीचा ऱ्हास आणि शक्ती यांचा समावेश होतो.शेतीतील कीटकनाशकांचा वापर दूर केल्याने जवळपासचे पक्षी आणि प्राणी तसेच शेताच्या जवळ राहणारे लोक यांना फायदा होतो.त्यामुळे या नैसर्गिक शेतीला सरकार आणि कृषी विभाग प्रोत्साहन देत असून त्यासाठी गावोगाव जागृती करत आहे.त्यातून हा धामोरी येथे कार्यक्रम संपन्न झाला आहे.
सदर मोहिमेची प्रस्तावना कृषी पर्यवेक्षक राजेश तुंबारे यांनी केली आहे तर तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांनी जीवामृत,दशपर्णी अर्क,गांडूळ खत,गांडूळ स्लरी, तसेच निमार्क घरच्या घरी कसे बनवावे याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले आहे.परिसरातील प्रगतशील शेतकरी विजय जाधव,कैलास माळी,बाजीराव मांजरे,अमोल माळी काकासाहेब वाघ,नंदलाल जगझाप,शामराव माळी,भाऊसाहेब माळी,विक्रांत जगझाप,शेतकरी गटाचे सचिव रोहित जगझाप व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपस्थितांचे आभार कृषी सहाय्यक योगेश माळी यांनी मानले आहे.